Kangana Ranaut Javed Akhtar Resolve Defamation Case : बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत व दिग्गज लेखक जावेद अख्तर यांच्यातील अनेक वर्षांपासून सुरू असलेला कायदेशीर खटला अखेर संपला आहे. दोघांनी हे कायदेशीर प्रकरण सोडवले आहे. कंगनाने सोशल मीडियावर जावेद अख्तर यांच्याबरोबरचा एक फोटो शेअर करून चाहत्यांना याची माहिती दिली आहे. शुक्रवारी, दोघे मुंबईतील वांद्रे येथील न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर राहिले आणि त्यांनी पाच वर्षे जुना वाद सोडवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जावेद अख्तर आणि कंगना रणौत २८ फेब्रुवारीला सकाळी १०.३० वाजता त्यांच्या वकिलांसह वांद्रे कोर्टात पोहोचले. तिथे त्यांनी मॅजिस्ट्रेट आशिष आवारी यांच्यासमोर पाच वर्षे जुनं कायदेशीर प्रकरण संपवलं.

कंगनाने इंस्टाग्राम स्टोरीवर जावेद अख्तर यांच्याबरोबर एक फोटो शेअर केला आणि लिहिलं, “आज, जावेद जी आणि मी मध्यस्थीद्वारे आमचे कायदेशीर प्रकरण (मानहानी प्रकरण) सोडवले आहे. जावेद जी यांनी मोठं मन ठेवून हे प्रकरण सोडवले. तसेच मी दिग्दर्शन करत असलेल्या माझ्या पुढच्या चित्रपटासाठी गाणी लिहिण्यासही त्यांनी होकार दिला आहे.”

कंगना रणौतची इन्स्टाग्राम स्टोरी (फोटो – स्क्रीनशॉट)

वाद नेमका काय?

कंगना रनौत व जावेद अख्तर यांच्यातील ही कायदेशीर लढाई २०२० मध्ये सुरू झाली होती. कंगनाने एका मुलाखतीत २०१६ मध्ये जावेद अख्तर यांच्याबरोबर झालेल्या भेटीची आठवण सांगितली होती. कंगना आणि हृतिक रोशनचे २०१६ मध्ये ब्रेकअप झाले होते, ज्यामुळे दोघांमध्ये बराच वाद झाला होता. रोशन कुटुंबाच्या जवळ असलेल्या जावेद अख्तर यांनी हृतिक रोशनची माफी मागण्यास सांगितलं होतं, असा दावा कंगनाने केला होता.

२०२१ मध्ये एका मुलाखतीत कंगना म्हणाली होती की, २०१६ मध्ये झालेली बैठक त्यांना अपमानजनक वाटली. त्यामुळेच त्यांनी तिच्याविरुद्ध मानहानीचा दावा करीत न्यायालयात धाव घेतली आहे. कंगना रणौतनेदेखील जावेद अख्तर यांच्याविरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला होता. मात्र, अख्तर यांच्यावरील कारवाईला दिंडोशी सत्र न्यायालयाने स्थगिती दिली होती.

फेब्रुवारीमध्ये कंगनाने जावेद अख्तर यांनी तिच्याविरुद्ध दाखल केलेल्या खटल्याला स्थगिती देण्याची मागणी केली होती. त्याबरोबरच अख्तर यांनी कंगनाविरुद्ध दाखल केलेला खटला आणि तिचा अख्तरविरुद्धचा खटला यांचा एकमेकांशी संबंध असून, त्यांची एकत्र सुनावणी व्हावी, अशी मागणी कंगनाने केली होती. आता जावेद अख्तर व कंगना रणौत यांनी जवळपास पाच वर्षांनी हे प्रकरण मिटवलं आहे.