अभिनेत्री कंगना रणौत मी सध्या तिच्या आगामी इमर्जन्सी या चित्रपटामुळे चर्चेत आहे. गेले अनेक महिने ती या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. काही दिवसांपूर्वी ती या चित्रपटाचे शूटिंग करण्यासाठी लोकेशन्स च्या शोधात होती. तसंच काही दिवसांपूर्वी तिने या चित्रपटाचं शूटिंग संसदेत करण्याची परवानगी मागितली असल्याचं समोर आलं होतं. पण आता यामागचं सत्य कंगनाने सांगितलं आहे.

खाजगी संस्थांना संसदेच्या संकुलात शूटिंग किंवा व्हिडिओग्राफी करण्याची परवानगी नसते. हे शूटिंग कोणत्या अधिकृत सरकारी कामासाठी केले जात असेल तर ती वेगळी बाब आहे. प्रामुख्याने दूरदर्शन आणि संसद टीव्ही यांनाच संसदेच्या आवारात चित्रीकरणाची करण्याची परवानगी आहे. पण अशातच कंगनाने संसदेत चित्रपटाच्या शूटिंगसाठी परवानगी मागितल्याच्या बातमीने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं.

principal suspended for negligence in duty in midday meal food poisoning case pmd
वर्धा : कर्तव्यात कसुर; मुख्याध्यापक निलंबित; शालेय पोषण आहार विषबाधा प्रकरण
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
prasad jawade reaction on amruta deshmukh enter in maharashtrachi hasyajatra
अमृता देशमुख ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये काम करणार असल्याचं समजताच नवऱ्याला झाला आनंद, अभिनेत्री म्हणाली…
Theatre canteen owner bites man's ear over food bill during 'Pushpa 2' screening.
Pushpa 2 : चित्रपटगृहाच्या कॅन्टीन मालकाने घेतला पुष्पा २ पाहायला आलेल्या प्रेक्षकाच्या कानाचा चावा, मध्यांतरावेळी नेमकं काय घडलं?
Bajrang Sonwane meets Amit Shah
“बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी”; शरद पवारांचा खासदार थेट अमित शाहांना भेटला
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”

आणखी वाचा : “शरीरसंबंध ठेवले तरच…” प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव; आयुष्मान, रणवीरच्या नावाचाही उल्लेख

अभिनेत्रीने लोकसभा सचिवालयाला लिहिलेल्या पत्रात संसदेच्या आवारात आणीबाणीवर आधारित चित्रपटाचं शूटिंग करण्याची परवानगी देण्याची विनंती केली होती, अशी बातमी एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने दिली होती. त्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की, “पहिल्यांदाच एखादा चित्रपटाला संसदेत शूटिंग करण्याची परवानगी मिळाली आहे. ‘इमर्जन्सी’चा एक छोटासा भाग या ठिकाणी शूट केला जाईल.” हीच पोस्ट आता कंगनाने परत शेअर करत ही बातमी खोटी असल्याचं सांगितलं आहे. याचाच अर्थ तिने ‘इमर्जन्सीचं’ शूटिंग संसदेत करण्यासाठी कोणाकडेही परवानगी मागितली नव्हती किंवा चित्रपटाचं शूटिंग संसद परिसरात करण्याचा तिचा कोणताही विचार नाही.

हेही वाचा : आलिया पाठोपाठ कंगनाही साकारणार देहविक्री करणाऱ्या स्त्रीची भूमिका; बायोपिकबद्दल पहिल्यांदाच केला खुलासा

‘इमर्जन्सी’चं शूटिंग या वर्षी जूनमध्ये सुरू झालं होतं. या चित्रपटात ती १९७५ मध्ये देशात आणीबाणी लागू करणाऱ्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्याचप्रमाणे कंगनाने या चित्रपटाच्या लेखनाची आणि दिग्दर्शनाची धुराही सांभाळली आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होईल.

Story img Loader