अभिनेत्री ते राजकारणी, असा प्रवास केलेल्या कंगना रणौतने यांनी दिल्लीत संसद पुस्तकालयातील बालयोगी सभागृहात ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगला हजेरी लावली. विक्रांत मॅसीची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाबद्दल कंगना यांनी गौरवोद्गार काढत हा चित्रपट खूप महत्त्वाचा आहे, असे सांगितले.
विक्रांतची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाबद्दल गौरवोद्गार काढताना त्यांनी मागील सरकारने अनेक तथ्ये लपवली, असे सांगितले. ‘एएनआय’शी बोलताना कंगना म्हणाल्या, “हा खूप महत्त्वाचा चित्रपट आहे. हा आपल्या देशाचा इतिहास आहे आणि मागील सरकारनं लोकांपासून अनेक गोष्टी लपवल्या. त्या काळातील गंभीर परिस्थितीत कसं राजकारण केलं गेलं, हे या चित्रपटातून लोकांसमोर आलं आहे.” विक्रांत मॅसीच्या ‘द साबरमती रिपोर्ट सिनेमाचे कंगना यांनी तोंडभरून कौतुक जरी केले असले तरी एकेकाळी या अभिनेत्री विक्रांतला झुरळ म्हणाल्या होत्या.
कंगनाने विक्रांतवर केलेली जुनी टिप्पणी पुन्हा चर्चेत
कंगना यांनी विक्रांतवर केलेली ‘झुरळ’ ही टिप्पणी पुन्हा चर्चेत आली आहे. २०२१ मध्ये यामी गौतमच्या लग्नाच्या फोटोवर विक्रांतने टिप्पणी करताना लिहिले होते, “राधे माँसारखी पवित्र आणि शुद्ध (Pure & Pious like Radhe Maa!) दिसत आहेस.” त्यावर कंगना यांनी संताप व्यक्त करीत म्हटले होते, “कुठून आला हा झुरळ माझी चप्पल घेऊन या!” (“कहाँ से निकला ये कॉकरोच…लाओ मेरी चप्पल!”) अशा आशयाची कमेंट कंगना यांनी तेव्हा केली होती.
#WATCH | Delhi: After watching the film 'The Sabarmati Report', BJP MP Kangana Ranaut says, "It is a very important film… It is our country's history and the previous government hid facts from the people. The film shows how people played politics in such a grave situation back… pic.twitter.com/Tnfi54kbXp
— ANI (@ANI) December 2, 2024
विक्रांत मॅसीचे लग्न झाल्यानंतर कंगना यांनी त्याला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. या शुभेच्छा देताना कंगना यांनी कमेंट करीत लिहिले होते की, विक्रांत मॅसीजी हिमाचलच्या मुलीशी लग्न करणं हे चांगलं कर्म आहे… दोघांना लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा!
‘द साबरमती रिपोर्ट’ला पंतप्रधानांकडून दाद
पंतप्रधान मोदी यांनी हा चित्रपट पाहिल्यानंतर कलाकार आणि निर्मात्यांचे कौतुक केले. X (पूर्वीचे ट्विटर) या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करीत त्यांनी लिहिले, “एनडीए खासदारांसह ‘द साबरमती रिपोर्ट’ पाहिला. या चित्रपटाचे निर्माते आणि कलाकारांचे मी अभिनंदन करतो.”
हेही वाचा…विक्रांत मॅसीच्या निवृत्तीच्या घोषणेवर त्याच्या सहकलाकाराने व्यक्त केली शंका, म्हणाला “हा तर पीआर…”
‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगला चित्रपटाच्या संपूर्ण टीमसह विक्रांत मॅसी, रिद्धी डोग्रा, दिग्दर्शक धीरज सरना, निर्मात्या एकता कपूर, ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र आदी मान्यवर उपस्थित होते. हा चित्रपट २००२ च्या गोध्रा ट्रेन दुर्घटनेवर आधारित आहे.