बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच तिच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर ती नेहमीच आपलं मत मांडताना दिसते. ज्यामुळे ती अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडते. पण वाद आणि कंगनाचं वेगळंच नातं आहे. ती नेहमीच बिनधास्तपणे स्वतःचं मत सोशल मीडियावर मांडताना दिसते. आताही तिने पंजाबमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर फेसबुक पोस्ट लिहिली आहे. ज्याची सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. खलिस्तानी नसलेल्या सीख लोकांना आपल्या या पोस्टमधून कंगनाने सल्लाही दिला आहे.
पंजाबमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. गुरुवारी इथल्या अमृतसरच्या अजनाला पोलिस ठाण्यावर हल्ला करण्यात आला. त्यानंतर ‘वारिस पंजाब दे’ संघटनेचे प्रमुख अमृतपाल सिंग यांच्या समर्थकांनी अजनाला ठाण्यावर कब्जा केला. पंजाबमध्ये हाताबाहेर गेलेल्या परिस्थितीचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटले. याबाबत कंगनाने एक पोस्ट शेअर करत आपलं मत मांडलं आहे.
आणखी वाचा- “डेटवर गेल्यानंतर मी…”, नोरा फतेहीचा मोठा खुलासा, अर्चना पूरन सिंह झाली थक्क
पंजाबमधील परिस्थितीवर आपलं मत मांडताना कंगनाने लिहिलं, “पंजाबमध्ये सध्या जे काही घडत आहे. याची भविष्यवाणी मी दोन वर्षांपूर्वीच केली होती. माझ्यावर त्यावेळी वेगवेगळे खटले दाखल करण्यात आले. माझ्या विरोधात अटकपत्रही जारी करण्यात आलं होतं. पंजाबमध्ये माझ्या कारवर हल्लाही झाला. पण अखेरीस तेच झालं जे मी सांगितलं होतं. आता वेळ आली आहे की खलिस्तानी नसलेल्या शीख लोकांना आपला हतू स्पष्ट करावा.”
आणखी वाचा- अक्षय कुमारचा ‘सेल्फी’ ठरला फ्लॉप; कंगना रणौतने धरलं करण जोहरला जबाबदार, म्हणाली…
दोन वर्षांपूर्वी काय म्हणालेली कंगना?
दोन वर्षांपूर्वी कंगना रणौतने शेतकरी विधेयकाचा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना आतंकवादी आणि खलिस्तानी म्हटलं होतं. कंगनाची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर तिच्यावर टीकेची झोड उठली होती. तिच्या विरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. एवढंच नाही तर तिच्या कारवरही हल्ला झाला होता. आता अजनाला पोलिस ठाण्यावर झालेल्या हल्ल्यानंतर कंगनाने पुन्हा यावर आपलं मत मांडत टीका केली आहे.