‘जवान’ चित्रपटाचा सध्या थिएटर्समध्ये जलवा पाहायला मिळत आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी दमदार कमाई केली आहे. चित्रपट बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड मोडेल असं दिसत आहे. अनेक सेलिब्रिटी शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेल्या या मल्टिस्टारर चित्रपटाचं कौतुक करत आहेत. अशातच कंगनानेही ‘जवान’चं कौतुक केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘जवान’ची ग्रँड ओपनिंग! शाहरुख खानच्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी मोडला ‘पठाण’चा रेकॉर्ड, कमावले तब्बल ‘इतके’ कोटी

“९०च्या दशकातील अल्टिमेट लव्हर बॉय होण्यापासून ते प्रेक्षकांशी जोडलेले नाते पुन्हा नव्याने जोडण्यासाठी चाळीशी ते पन्नाशीतील एक दशकाचा प्रदीर्घ संघर्ष आणि अखेरीस वयाच्या ६० व्या वर्षी भारतातील सुपर हिरो म्हणून उदयास येणं हे अगदी खऱ्या आयुष्यातही सुपर हिरोइक आहे. मला तो काळ आठवतो जेव्हा लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, त्याच्या चॉइसेसची खिल्ली उडवली पण मोठ्या करिअरचा आनंद घेत असलेल्या सर्व कलाकारांसाठी त्याचा संघर्ष हा एक मास्टर क्लास आहे,” असं कंगना रणौतने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटलं आहे.

कंगना रणौतची जवानबद्दलची इन्स्टाग्राम स्टोरी

“SRK हा सिनेमाचा देव आहे, ज्याची सिनेमाला फक्त त्याच्या मिठीसाठी किंवा डिंपल्ससाठीच नाही तर जगाला वाचवण्यासाठीही गरज आहे. किंग खान तुझी चिकाटी, मेहनत आणि नम्रतेला नमन,” असंही कंगनाने नमूद केलं.

“त्यांना मतं मांडण्याचा हक्क”, उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्माबाबतच्या वक्तव्यावर कमल हासन यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “तमिळनाडू हे…”

दरम्यान, ‘जवान’ गुरुवारी ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी चित्रपटाने दमदार कमाई केली आहे. चित्रपटाचं प्रेक्षकच नाही तर समीक्षकही कौतुक करत आहेत, त्यामुळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेल असं दिसत आहे. ‘पठाण’पाठोपाठ शाहरुख खानच्या ‘जवान’लाही प्रेक्षक भरभरून प्रेम देत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kangana ranaut praises shahrukh khan for jawan calls him god of cinema hrc