बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत सध्या चर्चेत आहे. कंगनाचा तामिळ चित्रपट ‘चंद्रमुखी २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतच या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. कंगनाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. यंदा गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर म्हणजेच स्पप्टेंबरमध्ये हा चित्रपट चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- ‘हाऊसफुल ५’ ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; अक्षय कुमारची मोठी घोषणा

‘चंद्रमुखी २’ च्या पोस्टरमध्ये राघव दरवाजाच्या छिद्रातून पाहत असल्याचे दाखवले आहे. Lyca Productions या प्रोडक्शन हाऊसच्या सोशल मीडिया हँडलवर हे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. पोस्टबरोबर कॅप्शन लिहिले आहे की, “गणेश चतुर्थीला बहुप्रतिक्षित सिक्वेल ‘चंद्रमुखी २’ चे दरवाजे उघडतील हे जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे.” कंगनाने पोस्टर शेअर करत लिहिले, “या सप्टेंबरमध्ये ती परत येत आहे… तुम्ही तयार आहात का?” #चंद्रमुखी2

चित्रपट निर्माते पी वासू यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट २००५ मध्ये आलेल्या सुपरस्टार रजनीकांत स्टारर चंद्रमुखी चित्रपटाचा सिक्वेल आहे. ‘चंद्रमुखी २’ मधील कंगना राणौतचा लूक काही आठवड्यांपूर्वी समोर आला होता, राघव लॉरेन्सच्या फॅन पेजने चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो पोस्ट केला होता. त्या फोटोमध्ये कंगनाने भरजरी कपडे आणि दागिने घातल्याचे दिसून आले होते.

हेही वाचा- पोटगीत किती रुपये घेतले? नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलियाने केला खुलासा, म्हणाली…

कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, काही दिवसांपूर्वी कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. याशिवाय कंगना ‘चंद्रमुखी २’ मध्येही झळकणार आहे. या चित्रपटात राधिका सरथकुमार, वाडीवेलू, लक्ष्मी मेनन, महिमा नांबियार, सृष्टी डांगे, रवी मारिया आणि सुरेश मेनन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kangana ranaut raghav lawrence chandramukhi 2 will release in september dpj
First published on: 30-06-2023 at 15:47 IST