‘द केरल स्टोरी’ चित्रपटावरून चांगलाच वाद सुरू आहे. चित्रपटांमधील दावे खोटे असल्याचं म्हणत त्यावर बंदी घालण्याचीही मागणी झाली. पण कोर्टाने त्यास नकार दिला व चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगली कमाईही केली. या चित्रपटाबद्दल सुरू असलेल्या वादावर कंगना रणौतने प्रतिक्रिया दिली आहे.

‘एबीपी माझा’च्या एका कार्यक्रमात बोलताना कंगना रणौतने ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाबद्दल भाष्य केलं. ती म्हणाली, “बघा, मी हा चित्रपट पाहिला नाही, पण चित्रपटावर बंदी घालण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. मी आजच वाचलं, जर मी चुकीची असेल तर दुरुस्त करा, पण चित्रपटावर बंदी घालता येणार नाही असं हायकोर्टाने म्हटलं आहे. मला वाटतं की तो चित्रपट ISIS शिवाय कोणालाही वाईट किंवा चुकीचं म्हणत नाही आहे. देशातील सर्वात जबाबदार संस्था उच्च न्यायालय असे म्हणत असेल तर त्यांचे म्हणणे बरोबर आहे. ISIS ही दहशतवादी संघटना आहे. मी त्यांना दहशतवादी म्हणत आहे, असं नाही, तर आपला देश, गृहमंत्रालय आणि इतर देशांनीही त्यांना तेच म्हटलं आहे.”

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
Adinath Kothare Manjiri Oak
“डोळ्यातून पाणी आलं…”, आदिनाथ कोठारेचे ‘पाणी’ चित्रपटासाठी कौतुक करत मंजिरी ओक म्हणाल्या, “ही तुझी पहिली फिल्म …”
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
Gashmeer Mahajani
“दिवसभर मद्यप्राशन करायचो, स्वत:ला सहा महिने कोंडून घेतलं…”, नैराश्यात गेलेला गश्मीर महाजनी, सांगितला ‘तो’ कठीण काळ
Punha Kartvya Aahe
Video: “तू काय प्रेम करणार?”, आकाशची वसुंधरावर नाराजी; प्रेक्षकांनी केले कौतुक, म्हणाले, “तुमची जोडी…”
vivek oberoi bollywood struggle
पहिल्याच सिनेमासाठी दिग्दर्शकानं नाकारलं, झोपडपट्टीत राहिला होता ‘हा’ अभिनेता; अनुभव शेअर करत म्हणाला, “मी त्यांच्या बोलण्याचा…”

‘The Kerala Story’ने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर कमावले ‘इतके’ कोटी, आकडेवारी आली समोर

कंगना पुढे म्हणाली, “जर तुम्हाला वाटत असेल की ती दहशतवादी संघटना नाही, तर मग तुम्हीही दहशतवादी आहात हे उघड आहे. जर तुम्हाला वाटत असेल की एखादी दहशतवादी संघटना दहशतवादी नाही. त्या संघटनेला कायदेशीर, नैतिकदृष्ट्या, सर्व प्रकारे दहशतवादी घोषित करण्यात आलंय, पण तुम्हाला तसं वाटत नसेल तर ती चित्रपटाची नाही तर तुमची समस्या आहे. तुम्ही आधी विचार केला पाहिजे की तुम्ही आयुष्यात कुठे उभे आहात?” असा प्रश्न कंगनाने विचारला.

Video: शरद पवारांनी पत्नीसह थिएटरमध्ये जाऊन पाहिला ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपट; सुप्रिया सुळे व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या…

कंगनाने चित्रपटाचा विरोध करणाऱ्यांवर टीका केली. “मी अशा लोकांबद्दल बोलत आहे, जे विचार करत आहेत की हा चित्रपट ISIS वर नाही तर त्यांच्यावर हल्ला करत आहे. तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही दहशतवादी आहात. इतकं साधं हे गणित आहे,” असं कंगना म्हणाली.

Story img Loader