उमेश पाल हत्याकांड प्रकरणातील फरार असलेला गँगस्टर अतीकचा मुलगा असद आणि शूटर गुलाम मोहम्मदला उत्तर प्रदेश पोलिसांनी ठार केलं आहे. झाशीतल्या बडागाव येथील परीछा डॅमजवळ एसटीएफने असद आणि गुलामचा एन्काउंटर केला. या एन्काउंटरबद्दल राजकीय स्तरावरून प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच अभिनेत्री कंगना रणौतनेही या एन्काउंटरवर प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गँगस्टर अतीक अहमदचा मुलगा एन्काउंटरमध्ये ठार, उमेश पाल हत्याकांडानंतर ४९ दिवसांनी एसटीएफला यश

“माझ्या भावासारखं कुणीच नाही,” असं कंगनाने ट्वीट करत म्हटलं आहे. या ट्वीटमध्ये तिने योगी आदित्यनाथ यांना टॅग केलंय. त्यांचा उल्लेख भाऊ असा करत तिने असदच्या एन्काउंटरवर प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाचं हे ट्वीट चांगलंच व्हायरल झालं आहे. कंगनाच्या या ट्वीटवर अनेकांनी तिचं म्हणणं बरोबर आहे, असं म्हणत समर्थन केलंय.

नेमकं प्रकरण काय?

गँगस्टर अतीकचा मुलगा असद आणि शूटर गुलाम मोहम्मद या दोघांनी २४ फेब्रुवारी रोजी उमेश पाल यांची हत्या केली आणि दोघेही फरार झाले. एसटीएफचं विशेष पथक सातत्याने या दोन आरोपींचा शोध घेत होतं. ते दोघे झाशी येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना ठार केलं.

४९ दिवसांपासून दोघांचाही शोध पोलीस घेत होते. महत्त्वाचं म्हणजे दोघांवरही प्रत्येकी पाच-पाच लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांकडे परदेशी शस्त्रं सापडली आहेत.