बॉलीवूड अभिनेत्री आणि हिमाचल प्रदेशच्या मंडीची खासदार कंगना रणौतने (Kangana Ranaut) कायमच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहत असते. ती अनेकदा राजकीय व मनोरंजन क्षेत्राशी संबंधित विषयांवर भाष्य करत असते. अशातच कंगणा एका विशेष कारणाने चर्चेत आली आहे आणि हे कारण म्हणजे तिला आलेलं विजेचं बिल. वीज बिलाचा मोठा झटका लागला आहे. याविरोधात तिने काँग्रेसच्या नेतृत्वाखालील हिमाचल प्रदेश सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
हिमाचल प्रदेशमधील मंडी इथं नुकत्याच झालेल्या एका राजकीय कार्यक्रमादरम्यान कंगना यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. यावेळी तिने तिच्या मनालीमधील घराचं वीज बिल एक लाख रुपये आल्याचं सांगितलं आहे. कंगनाचं मुंबईशिवाय मनालीमध्येही एक घर आहे आणि तिच्या याचं घराचं वीज बिल लाख रुपये झाल्याने कंगणाला मोठा धक्का धक्का बसला आहे. विशेष म्हणजे या घरात कंगना क्वचितच राहत असल्याचे तिने स्वत: सांगितलं आहे.
मंगळवारी मंडीमधील बल्ह विधानसभा क्षेत्रातील लोकांना संबोधित करताना कंगना म्हणाली की, “या महिन्यात माझ्या मनालीतील घराचं विजेचं बिल १ लाख रुपये आलं. या घरात मी राहतही नाही. इतकी दुर्दशा केलेली आहे. शरम वाटते की हे काय होत आहे. हिमाचल प्रदेशची अवस्था पाहणे वेदनादायक आहे.”
यापुढे तिने म्हटलं आहे की, “आपल्याकडे एक संधी आहे. तुम्ही सर्वजण जे मला माझ्या भावाबहिणींसारखे आहेत, तुम्ही ग्राऊंड लेव्हलला इतकं काम करता. आपलं दायित्व आहे की, आपल्याला या देशाला, या प्रदेशाला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जायचंय. मी तर म्हणेन की, हे सर्वजण लांडगे आहेत आणि आपल्याला त्यांच्या तावडीतून बाहेर पडायचं आहे.” तिच्या या विधानाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
कंगणा मनोरंजन क्षेत्रासह राजकीय क्षेत्रातही बरीच सक्रीय असते. २०२४ मध्ये तिने राजकारणात प्रवेश केला. हिमाचल प्रदेशातील मंडी या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि तिथे तिचा विजय झाला होता. कंगणाने भाजपकडून ही निवडणूक लढवली होती. तर अभिनेत्रीचा नुकताच ‘इमर्जन्सी’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यात तिने इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली होती.
दरम्यान, कंगणाच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. यानंतर आता ती अभिनेता आर. माधवनबरोबरच्या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे तिच्या या चित्रपटाची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.