बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत सध्या तिच्या आगामी ‘टिकू वेड्स शेरू’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाची निर्मिती कंगना राणौतच्या मणिकर्णिका फिल्म्सने केली आहे. ‘टिकू वेड्स शेरू’मध्ये नवाजुद्दीन सिद्दिकी आणि अवनीत कौर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

हेही वाचा : प्रसिद्ध गायिका असीस कौरने गुपचूप उरकले लग्न; नवरा आहे बॉलीवूडचा प्रसिद्ध संगीतकार

hina khan cancer battle
कर्करोगाशी लढा देणाऱ्या हिना खानने शेअर केले फोटो; प्रकृतीबद्दल अपडेट देत म्हणाली, “गेले १५ ते २० दिवस माझ्यासाठी…”
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Shabana Azmi And Nandita Das
“नंदिताने तिचे बोट माझ्या ओठांवर…”, ‘फायर’ चित्रपटातील इंटिमेट सीनबद्दल शबाना आझमी म्हणाल्या, “ते काही रोमँटिक…”
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
Shalva Kinjawadekar and Shreya Daflapurkar Pre Wedding Rituals
आली लग्नघटिका समीप! पार पडला ग्रहमख सोहळा, ‘शिवा’ फेम अभिनेत्याच्या होणार्‍या पत्नीने शेअर केले खास फोटो
salman khan mother danching with helan
Video : सलमान खानच्या आईने हेलन यांच्याबरोबर धरला ठेका; उपस्थितही पाहतच राहिले, व्हिडीओ होतोय व्हायरल

‘टिकू वेड्स शेरू’ चित्रपटात नवाजुद्दीन साकारत असलेल्या टिकू पात्राची भूमिका सर्वात आधी इरफान खानने करावी अशी कंगनाची इच्छा होती, परंतु इरफान गंभीर आजाराशी लढा देत होता म्हणून हा चित्रपट अनेक वर्ष रखडला होता. कंगना रणौतने सोशल मीडिया अकाऊंटवर स्टोरी शेअर करीत दिवंगत अभिनेता इरफान खानसाठी लिहिले आहे की, “काही वर्षांपूर्वी आम्ही टिकू आणि शेरू होणार होतो…आज चित्रपट रिलीजच्या उंबरठ्यावर असताना, इरफान सरांची खूप आठवण येत आहे.”

हेही वाचा : “वाल्मिकी रामायणाचा घोर अपमान” ‘शक्तिमान’ फेम मुकेश खन्ना ‘आदिपुरुष’च्या निर्मात्यांवर संतापले; म्हणाले “हा तमाशा…”

कंगनाने याबाबत ‘टिकू वेड्स शेरू’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमातही खुलासा केला होता. कंगनाने सांगितले की, “हा चित्रपट माझ्यासाठी खूप खास आहे कारण, हा चित्रपट काही वर्षांपूर्वीच लॉन्च करण्यात आला होता. सहा-सात वर्षांपूर्वी इरफान सर आणि मी हा चित्रपट करत होतो. त्यावेळी चित्रपटाचे नाव होते ‘डिव्हाईन लव्हर्स असे ठेवण्यात आले होते, परंतु दुर्दैवाने तेव्हा चित्रपटाची निर्मिती करण्यात आम्ही अयशस्वी ठरलो. याचे दिग्दर्शक साई कबीर श्रीवास्तव तीन-चार वर्षांपासून आजारी होते, त्यानंतर इरफानचे एप्रिल २०२० मध्ये निधन झाले आणि चित्रपट रखडला. इरफान सरांना आज आम्ही खूप मिस करत आहोत. “

हेही वाचा : “प्रेम, मैत्री आणि दु:ख…” बहुचर्चित ‘द आर्चीज’चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, ३ स्टारकिड्सचे बॉलीवूडमध्ये पदार्पण

दरम्यान, ‘टिकू वेड्स शेरू’ मध्ये अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकी पहिल्यांदाच अवनीत कौरबरोबर काम करणार आहे. हा चित्रपट २३ जूनला अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.

Story img Loader