कंगना रणौत ही तिच्या लाजवाब अभिनय आणि बेधडक स्वभावामुळे बऱ्याचदा चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून कंगनाने बॉलिवूडमधील नेपोटीजम आणि माफियाबद्दल उघडपणे भाष्य करायला सुरुवात केली. याबरोबरच कंगना तिची राजकीय मतंदेखील परखडपणे मांडत असते. मध्यंतरी माजी राज्यसभा सदस्य सुब्रमण्यम स्वामी आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याबद्दल कंगनाने केलेल्या वक्तव्यामुळे चांगलाच गदारोळ झाला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यानंतर कंगनाला ‘Y+’ सुरक्षा देण्यात आली होती. यानंतर कंगनाच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली. आता नुकतंच या विषयावर सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा भाष्य केलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणाले, “एसपीजीला (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) माहीत आहे आणि त्यांनी कंगनाच्या हालचालींची नोंद ठेवली आहे. मला आश्चर्य वाटते की बॉलीवूड स्टार्सचा मागोवा घेणे हा एसपीजीचा व्यवसाय नसावा का? कंगनाच्या बाबतीत खास शिफारसीमुळेच तिला उच्च स्तरीय सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.”

आणखी वाचा : ‘OMG 2’ च्या प्रदर्शनात सेन्सॉर बोर्डची पुन्हा आडकाठी; अक्षय कुमारच्या पात्रासाठी सुचवला ‘हा’ बदल

या ट्वीटला कंगनाने तिच्या स्टाइलमध्ये सडेतोड उत्तर दिलं आहे. कंगना म्हणाली, “मी केवळ एक बॉलिवूड स्टार नाही. मी या देशातील स्पष्ट मत मांडणारी आणि तितकीच जवाबदार नागरिक आहे. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील राजकीय द्वेषातून निर्माण झालेल्या वादात मला उगाचच खेचण्यात आलं. मी ‘टुकडे-टुकडे’ गँगबद्दलही उघडपणे बोलते, याबरोबरच मी खलिस्तानी गटांचा तीव्र निषेध केला आहे.”

पुढे कंगना म्हणाली, “मी एक चित्रपट निर्माती आणि लेखिकाही आहे. माझ्या पुढील चित्रपट ‘ईमर्जन्सि’मध्ये ऑपरेशन ब्लुस्टारचाही उल्लेख आहे. अशा विविध कारणांमुळे माझ्या जीवाला प्रचंड, याचसाठी मी माझी सुरक्षा वाढवून घेतली आहे, हयात माझं काही चुकलं आहे का?” कंगनाच्या या ट्वीटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. तिचे चाहते तिच्या समर्थनार्थ ट्वीट करत याबद्दल त्यांचं मत मांडत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kangana ranaut responds to subramanian swamy question about her y plus security avn