अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच तिच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच तिने ट्विटरवर पुनरागमन केलं. त्यानंतर तिने केलेले ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शाहरुख खान व दीपिका पदुकोणच्या ‘पठाण’ चित्रपटाला मिळत असलेल्या यशाबाबतही तिने भाष्य केलं. आताही ती ‘पठाण’बाबत वेगवेगळे ट्वीट करत आहे. यावरुनच एक युजरने कंगनाला तिच्या ‘धाकड’ चित्रपटाची आठवण करुन दिली.

आणखी वाचा – शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाबाबत सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य, म्हणाल्या, “तो भारताचा…”

bihar man murder Mumbai
मुंबई: हातावर गोंदवलेल्या प्रेयसीच्या नावामुळे लागला हत्येचा छडा, प्रेमप्रकरणावरून बिहारमधील तरुणाची मुंबईत हत्या
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
vidya balan on sridevi
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचं कौतुक करत विद्या बालनने व्यक्त केली इच्छा; म्हणाली, “मला त्यांना…”
A fan asked Aishwarya Narkar for dinner, the actress gave funny answer
एका चाहत्याने ऐश्वर्या नारकरांना विचारलं डिनरसाठी, अभिनेत्रीने दिलं जबरदस्त उत्तर; म्हणाल्या…
Arjun Kapoor And Malaika Arora
“त्रासदायक लोकांना…”, अर्जुन कपूरने ब्रेकअप बद्दल खुलासा केल्यानंतर मलायका अरोराने केलेली पोस्ट
Aruna Sabane asked harassed Priya Phuke is not beloved BJP sister
प्रिया फुके ही सरकारची ‘लाडकी बहीण ‘नाही आहे का? सामाजिक कार्यकर्त्या अरुणा सबाने यांचा सवाल
Padmashri Physicist Dr Rohini Godbole Memoirs by Researcher Dr Radhika Vinze
विज्ञानव्रती

नेमकं प्रकरण काय?

“कंगना तुझ्या ‘धाकड’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी फक्त ५५ लाख रुपये कमाई केली होती. शिवाय या चित्रपटाचं संपूर्ण बॉक्स ऑफिस कलेक्शन फक्त २ कोटी ५८ लाख रुपये होतं. पण ‘पठाण’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. कंगना नक्कीच निराश झाली असणार.” असं एका युजरने कंगनाच्या ट्विटवर कमेंट केली.

या युजरला कंगनाने अगदी स्पष्ट शब्दांमध्ये उत्तर दिलं. कंगना म्हणाली, “हो, ‘धाकड’ हा एक मोठा ऐतिहासिक फ्लॉप चित्रपट होता. ही गोष्ट मी कधीच टाळली नाही. शाहरुख खानचा गेल्या दहा वर्षांमध्ये हा पहिलाच चित्रपट चालला आहे. मीही त्याच्याकडून प्रेरणा घेते. भारताने जशी संधी त्याला दिली तशी आम्हालाही मिळेल अशी मी आशा करते. कारण भारत देश महान आहे. जय श्रीराम”.

आणखी वाचा – शाहरुख खानच्या ‘पठाण’ने तीन दिवसांमध्येच जगभरात कमावले इतके कोटी, खरी आकडेवारी समोर

काही दिवसांपूर्वीच कंगनाने तिच्या आगामी चित्रपटाच्या रॅपअप पार्टीदरम्यान ‘पठाण’बाबत भाष्य केलं होतं. तिने शाहरुखच्या या चित्रपटाचं कौतुकही केलं. शिवाय हिंदी चित्रपटांना पुढे आणण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असल्याचंही कंगनाने म्हटलं होतं. आता शाहरुखच्या या चित्रपटाने जगभरात ३०० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे.