अभिनेत्री व खासदार कंगना रणौत (Kangana Ranaut) या सातत्याने चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच त्यांची प्रमुख भूमिका असलेला इमर्जन्सी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. तेव्हादेखील कंगना रणौत मोठ्या चर्चेत असल्याचे दिसल्या. मात्र, त्यांच्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर यश मिळाले नाही. आता कंगना रनौत यांनी एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यामुळे त्या चर्चेत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे रेस्टॉंरट म्हणजे…

कंगना रणौत यांनी नुकताच ‘ब्रूट इंडिया’बरोबर संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांच्या माउंटन स्टोरी या त्यांच्या मनालीमध्ये सुरू केलेल्या रेस्टॉरंटबद्दल वक्तव्य केले. हे रेस्टॉरंट का सुरू केले याबद्दल बोलताना त्यांनी म्हटले, “हे रेस्टॉंरट म्हणजे माझ्यासाठी गिफ्ट आहे. माझ्यासाठी व्यग्र राहण्याचा आणखी स्रोत आहे. मी लेखिका आहे, चित्रपट निर्माती आहे, मी अभिनेत्रीसुद्धा आहे. हे रेस्टॉरंटसुद्धा माझ्यासाठी व्यक्त होण्याचं माध्यम आहे.”

कंगना रणौत यांनी पुढे बोलताना म्हटले, “मी त्या लोकांपैकी नाही, जे स्टॉक खरेदी करतात किंवा भाड्यानं घरं देऊन पैसे कमवतात. मला ते आवडत नाही. मला वाटतं की, मला जास्तीत जास्त लोकांमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. त्यांच्याशी स्वत:ला जोडून घेता आलं पाहिजे. माझ्या आयुष्याचे काही फंडे जास्तच मूर्खासारखे आहेत. मीसुद्धा तशीच आहे. मूर्ख बनून राहणं मला आवडतं.”

२०१३ मध्ये एका मुलाखतीत तिला विचारले होते की, पुढच्या १० वर्षांत ती स्वत:ला कुठे पाहते? त्यावर तिने उत्तर दिले होते की, मला माझं ओपन कॅफे सुरू करायचं आहे. या मुलाखतीत दीपिका पदुकोणसुद्धा हजर होती. त्यावेळी दीपिकाने म्हटले की, मी तुझ्या कॅफेमधील पहिली ग्राहक असेन. आता काही वर्षांनंतर जेव्हा कंगनाने रेस्टॉरंट सुरू केले, त्यावेळी तिने इन्स्टाग्रामवर जुना व्हिडीओ शेअर करीत दीपिकाला टॅग केले होते. तसेच तू माझ्या रेस्टॉरंटमधील पहिली ग्राहक असायला पाहिजे, असे लिहिले होते.

दरम्यान, कंगना रणौत या नुकत्याच इमर्जन्सी या चित्रपटात दिसल्या होत्या. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका त्यांनी साकारली होती. १७ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अनुपम खेर, श्रेयस तळपदे, मिलिंद सोमण, विशाक नायर आणि दिवंगत अभिनेते सतीश कौशिक हे कलाकार या चित्रपटात दिसले होते.