आपल्याला अनुष्का शर्माचं करिअर संपवायचं होतं, असं म्हणतानाचा करण जोहरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्याचा हा व्हायरल व्हिडीओ पाहून कंगना रणौत करणवर चांगलीच संतापली होती. त्यानंतर करणने एक क्रिप्टीक पोस्ट करत कंगनाला उत्तर दिलं होतं. त्यावर आता कंगना रणौतने प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अनुष्काच्या करिअरबद्दल काय म्हणाला होता करण जोहर?

“मला अनुष्का शर्माचं करिअर पूर्णपणे संपवायचं होतं. यामागचं कारण म्हणजे जेव्हा आदित्य चोप्राने मला तिचे फोटो दाखवले होते तेव्हा मी म्हटलं होतं की, अनुष्काला चित्रपटासाठी साईन करण्याची काहीच गरज नाही. कारण तेव्हा माझ्या ओळखीत असलेल्या एका अभिनेत्रीला आदित्यने साईन करावं अशी माझी इच्छा होती”, असं करण म्हणाला होता.

Video: “तुला लाज वाटत नाही का?” विचित्र ड्रेस घातलेल्या जान्हवी कपूरला नेटकऱ्यांनी सुनावलं, भारतीय संस्कृतीची करून दिली आठवण

करणच्या व्हिडीओवर कंगनाची प्रतिक्रिया

करणच्या या व्हिडीओवर “या चाचा चौधरी फक्त हे एकच काम आहे”, असं कंगना करणचा व्हिडीओ स्टोरीला शेअर करत म्हणाली होती.

करणने शेअर केलेली क्रिप्टीक पोस्ट

“लगा लो इल्जाम….
हम झुकने वालों में से नहीं,
झूठ का बन जाओ गुलाम,
हम बोलने वालों में से नहीं,
जितना नीचा दिखाओगे,
जितना आरोप लगाओगे,
हम गिरने वालों में से नहीं,
हमारा कर्म हमारी विजय है,
आप उठा लो तलवार,
हम मरने वालों में से नहीं।” असे करण जोहरने पोस्टमध्ये म्हटलं होतं.

“हम झुकने वालों में से नहीं” अनुष्काबद्दलच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर करण जोहरच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाला “हमारा कर्म…”

कंगना रणौत काय म्हणाली?

“एक काळ होता जेव्हा चाचा चौधरी एलाइट नेपो माफियांबरोबर मिळून माझा नॅशनल टीव्हीवर अपमान करत होता. कारण मला इंग्रजी बोलता येत नव्हतं. आज याची हिंदी पाहून विचार आला की आता तर फक्त तुझी हिंदी सुधारली आहे, पुढे पाहा काय काय होणार ते,” असं कंगनाने म्हटलं आहे. तिने इन्स्टाग्रामवर ही स्टोरी पोस्ट केली आहे.

कंगना राणौतची इन्स्टाग्राम स्टोरी

दरम्यान, कंगनाने करण जोहरवर टीका करण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही दिवसांपूर्वी प्रियांका चोप्रानेही आपल्याला बॉलिवूडमध्ये कॉर्नर केलं गेलं, असं म्हटलं होतं. तेव्हाही कंगनाने करणवर निशाणा साधला होता.