बॉलिवूडची क्वीन अशी ओळख असलेली अभिनेत्री कंगना रणौत ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. तिच्या चित्रपटांपेक्षा जास्त वादग्रस्त वक्तव्यामुळे कंगनावर टीका होत असते. आता कंगना तिच्या अशाच एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. आपल्या देशात सैन्याचं प्रशिक्षण अनिवार्य करण्याबद्दल कंगनाने वक्तव्य केलं आहे.
नुकतंच ‘न्यूज १८’च्या ‘अमृत रत्न २०२३’ या कार्यक्रमात कंगनाने हजेरी लावली. याच कार्यक्रमात देशातील लोकांना शिस्त लागण्याबद्दल वक्तव्य केलं आहे. खासकरून आळशी लोकांविषयी भाष्य करत कंगना म्हणाली, “जर आपल्या देशात प्रत्येक विद्यार्थ्याला पदवी घेतल्यानंतर सैन्याचं प्रशिक्षण अनिवार्य केलं तरच आपल्या देशातील कित्येक आळशी व बेजबाबदार लोकांना शिस्तीचं महत्त्व कळेल.”
आणखी वाचा : “तो फार नशीबवान…” ‘केजीएफ’ स्टार यशबद्दल रवी तेजाने केलेलं वक्तव्य चर्चेत; अभिनेत्याचे चाहते नाराज
याबरोबरच कित्येक बॉलिवूड स्टार आणि क्रिकेटर्स आपल्या शत्रू राष्ट्रातील कलाकार व खेळांडूंशी सलोख्याचे संबंध ठेवून आहेत अन् यामुळे बॉलिवूडची प्रतिमा मलिन होत आहे याबद्दलही कंगनाने भाष्य केलं. कंगना म्हणाली, कंगनाचं हे वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आहे.
कंगनाने याबरोबरच बॉलिवूडच्या लोकांवरही निशाण साधला आहे. आता लवकरच कंगना तिच्या ‘तेजस’ या मिलिट्री ड्रामामधून प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटात कंगनाने महिला पायलट तेजस गिलची भूमिका निभावली आहे. याबरोबरच कंगना इंदिरा गांधी यांच्या बायोपिक ‘इमर्जन्सि’मध्येही झळकणार आहे, या चित्रपटाचं दिग्दर्शनही कंगनानेच केलं आहे.