बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कंगना सामाजिक असो वा राजकीय प्रत्येक मुद्यावर आपलं मत मांडत असते. नुकतीच ती संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन समारंभाला हजर होती. ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. यासोबतच एका मुलाखतीत ती काही राजकीय मुद्द्यांवर बोलली आहे.
मुलाखतीत कंगनाला विचारण्यात आलं की I.N.D.I.A. आघाडी झाल्यानंतर देशाचे नाव बदलले कारण मोदी घाबरले? आणि 2024 च्या निवडणुका येत असल्याने त्यांना विरोधकांची भीती वाटत आहे, असं विरोधी आघाडीचे म्हणणं आहे. या प्रश्नाला उत्तर देताना कंगना म्हणाली, “जे या देशाचे कर्तेधर्ते नेते आहेत, त्यांना भ्रष्ट चेहऱ्यांची भीती वाटलीच पाहिजे कारण त्यांनी स्वतःचे नाव I.N.D.I.A. ठेवले आहे. त्यामुळे त्यांना भीती वाटेलच, कारण देशाचे संस्कार त्यांना जपायचे आहेत.”
३३ वर्षे ज्या चाळीत राहिले, तिथे जॅकी श्रॉफ यांनी दिली भेट; म्हणाले, “त्या चाळीसाठी माझ्या…”
कंगनाने पुढे म्हणाली, “जे लोक खूप खोलवर विचार करतात, ते असाही विचार करतात की कुठे आपण देशात स्वामी विवेकानंद आणि महात्मा गांधी यांच्या संस्कारांबद्दल बोलतोय, तर अशा गँगने स्वतःचे नाव I.N.D.I.A. ठेवले आहे, जिथे प्रत्येक व्यक्तीवर भ्रष्टाचार आणि घोटाळ्याचे आरोप आहेत. त्यामुळे पंतप्रधान नक्कीच चिंतेत असतील. म्हणूनच ते नाव बदलण्याचा विचार करत आहेत. इंडियाचे नाव बदलून भारत ठेवले तर मला त्यात काही नुकसान दिसत नाही. पण ज्यांच्यावर घोटाळे आणि भ्रष्टाचाराचे आरोप आहेत ते या नावाने गँग बनवतात, ही निश्चितच चिंतेची बाब आहे. भ्रष्टाचाऱ्यांनी देशाचं नाव आघाडीसाठी वापरू नये, याबद्दल संविधानात कायदा असावा, कारण हे असंच सुरू राहिल्यास कोणी कोणतंही नाव वापरू लागेल, जे योग्य नाही.”
दरम्यान, कंगना रणौत लवकरच ‘चंद्रमुखी २’ मध्ये दिसणार आहे. याशिवाय ती ‘तेजस’मध्येही दिसणार आहे. आणीबाणीवर आधारित तिच्या ‘इमर्जन्सी’च्या चित्रपटाचीही जोरदार चर्चा आहे. या चित्रपटात ती देशाच्या दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शनही कंगनाने केले आहे. कंगना व्यतिरिक्त यात अनुपम खेर, महिमा चौधरी, विशाल नायर आणि श्रेयस तळपदे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.