बॉलीवूडची ‘कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन’ कंगना रनौत नेहमी चर्चेत असते. प्रत्येक घडामोडीवर ती भाष्य करते. पण, काही वेळेला तिनं केलेलं हे भाष्य वादाच्या भोवऱ्यात सापडतं. आता कंगनानं शब्दांचे वार करीत ‘कॉफी विथ करण’ शोचा जुना व्हिडीओ शेअर केला आहे; ज्यामध्ये सोनम कपूर कंगनाच्या इंग्रजीची खिल्ली उडवताना दिसत आहे.

कंगनानं इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर केलेल्या ‘कॉफी विथ करण’च्या तिसऱ्या पर्वाच्या या जुन्या व्हिडीओत सोनम कपूरबरोबर दीपिका पदुकोण पाहायला मिळत आहे. यावेळी रॅपिड फायर राऊंड खेळताना करण जोहर सोनमला विचारतो, “जर तुझ्याकडे सेलिब्रिटींशी फ्लुएंट इंग्रजी बोलण्यासाठी एखादी शक्ती असेल, तर तू त्या शक्तीचा वापर कोणासाठी करशील.” या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी सोनम म्हणते, “याचं उत्तर मी नक्की देऊ शकते?” यावेळी करण म्हणतो, ‘हो.’ तेव्हा सोनम कंगनाच्या फॅशन सेन्सचं कौतुक करून, तिच्या इंग्रजीची खिल्ली उडवताना दिसते आहे.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
Zeenat Aman
‘डॉन’ नाही, तर ‘या’ चित्रपटात दिसणार होतं ‘खइके पान बनारस वाला’ गाणं पण…, झीनत अमान यांनी सांगितलेला किस्सा चर्चेत
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”

हेही वाचा – ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात ‘त्या’ दोघांचीही कामगिरी महत्त्वाची; केदार शिंदेंच्या पोस्टनं वेधलं लक्ष

हेही वाचा – “लग्न हा एक खेळ” अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा असं का म्हणाला?, पाहा व्हायरल व्हिडीओ

या जुन्या व्हिडीओवर कंगना म्हणाली, “या चित्रपटमाफियाबरोबर इतकी वर्षं लढून मी काय मिळवलं? तर यापुढे बाहेरच्या कोणत्याच व्यक्तीला इंग्रजी न येण्याबाबत चिडवलं जाणार नाही. तसंही हा शो आता कायमचा बंद झाला आहे.”

पुढच्या स्टोरीमध्ये कंगनानं लिहिलं, ‘मी जे त्याला हजरजबाबीपणे शेवटी उत्तर दिलं आहे ते नक्की बघा. २४ वर्षांची असूनही खुलेआमपणे मला धमकावले, अपमानित केले, माझी खिल्ली उडवली तरीही मी शांत, सोज्वळ, नम्रतेनं जसं उत्तर दिलं तसं वागणं तथाकथित चांगलं शिक्षण घेतलेल्या आणि इंग्रजी बोलून चहाड्या करणाऱ्या काकूंच्या ग्रुपला कधीच जमणार नाही.’

हेही वाचा – ओटीटीवर पदार्पण करणारी नर्गिस फाखरी चर्चेत; म्हणाली, “मी कोणत्याही प्रोजेक्टसाठी नग्न…”

दरम्यान, कंगनाच्या कामाबाबत बोलायचं झालं तर, ती ‘इमरजेंसी’ चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्याशिवाय ‘तेजस’ चित्रपटातही कंगना झळकणार आहे; जो २० ऑक्टोबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader