बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत आपल्या अभिनयाबरोबरच आपल्या वक्तव्यांवरुनही नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियावर कंगना नेहमी काही ना काहीतरी पोस्ट करत असते. या पोस्टच्या माध्यामातून देशात सुरू असलेल्या समस्यांबद्दल तर कधीकधी अभिनेत्री चाहत्यांना तिच्या खासगी आयुष्यातील काही अपडेट देत असते. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये कंगनाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती. त्या भेटीची आठवण करत कंगनाने इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केली आहे,
कंगना राणौतने तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ही व्हिडिओ कंगना आणि सीएम योगी यांच्या पहिल्या भेटीची आहे. सीएम योगींनी तिला पहिल्या भेटीत काय सांगितले होते तेही कंगनाने सांगितले. व्हिडिओ शेअर करताना कंगनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘योगी जी पहिल्या भेटीत म्हणाले, तुम्ही माझी बहीण आहात आणि तुमच्या सुरक्षेशी संबंधित काही असेल तर मला सांगा, इतके महान आणि सभ्य व्यक्तिमत्त्व योगी जी, तुमचे यश आणि प्रसिद्धी संपूर्ण जगात पसरु दे.”
योगी आदित्यनाथ यांचा फोटो शेअर करत कंगनाने लिहिले की, “धर्मग्रंथ असे सांगतात की, धर्माची स्थापना केवळ धर्माचे पालन केल्याने होत नाही, तर अधर्माचा नाश केल्याने होते. अयोध्येला तपस्वी राजांची परंपरा आहे, ज्यांनी भारताचे रक्षण केले. जय श्री राम.
गुन्हेगारी विश्वातून राजकारणात आलेला माजी खासदार अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ या दोघांची पोलिसांच्या ताब्यात असताना शनिवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली. त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी प्रयागराज येथील वैद्यकीय महाविद्यालयात नेले जात असतानाच हा हल्ला झाला. . याप्रकरणावर विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. काही बॉलिवूड सेलिब्रिटींनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. असदच्या एन्काउंटर प्रकरणात सीएम योगी यांनी केलेल्या कठोर कारवाईबद्दल काही सेलिब्रिटीही त्यांचे कौतुक करत आहेत.