अभिनेत्री कंगना रणौत सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अनेक जुने व्हिडीओ शेअर करत असते. आता तिने सलमान खानचा टीव्ही रिअॅलिटी शो ‘दस का दम’मधील एक थ्रोबॅक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना कंगनाने त्यांच्या तरुण दिसण्यावर कमेंट केली आहे.

हेही वाचा – “त्याने मला…”, गरोदर असल्याचं कळताच जेव्हा नीना गुप्तांनी विवियन रिचर्ड्सना केला होता फोन

कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने ड्रेसवर लेहेंगा घातलेला दिसत आहे. ती हे करत असताना प्रेक्षक तिच्यासाठी टाळ्या वाजवतात आणि सलमान म्हणतो, “टाळ्या वाजवा..किती स्पोर्टिंग.” त्यानंतर कंगना व सलमान खान माधुरी दीक्षितच्या “धक धक करने लगा” गाण्यावर डान्स करतात. व्हिडीओ शेअर करताना कंगनाने लिहिलं, “देवा!!! सलमान खान आपण इतके तरुण का दिसतो?? याचा अर्थ आपण आता नाही आहोत?” असं म्हणत तिने हसणारे इमोजी टाकले.

kangana ranaut
कंगना रणौतची स्टोरी

हा व्हिडीओ कंगनाच्या एका चाहत्याने कॅप्शनसह पोस्ट केला होता. ‘जेव्हा सलमानने कंगनाला घागरा चोलीमध्ये परफॉर्म करायला लावले तेव्हा… ती धीर गंभीर भूमिकांपेक्षा बरंच काही करू शकते’ असं कॅप्शन त्या व्हिडीओला दिलं होतं.

कंगना आणि सलमान चांगले मित्र आहेत. काही दिवसांपूर्वी कंगना सलमानची बहीण अर्पिता खान शर्माच्या ईद पार्टीत सहभागी झाली होती. सलमान तिचा खूप चांगला मित्र असल्याचंही ती बऱ्याचदा सांगत असते. ‘सिद्धार्थ कन्नन’ला दिलेल्या मुलाखतीत कंगना म्हणाली होती, “सलमान माझा खूप चांगला मित्र आहे, त्याने पार्टीला बोलावलं आणि मी गेले.” दोघांच्याही कामाबद्दल बोलायचं झाल्यास कंगना आता ‘इमर्जन्सी’ या चित्रपटात दिसणार आहे. तर, सलमान ‘टायगर ३’च्या शुटिंगमध्ये व्यग्र आहे.

Story img Loader