बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या त्याच्य किसी का भाई किसी की जान चित्रपटामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून सलमानला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. सतत मिळणाऱ्या या धमक्यांमुळे मुंबई पोलिसांनी सलमानला वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवली आहे. नुकतंच सलमानने रजत शर्मा यांच्या ‘आप की अदालत’ (Aap Ki Adalat) या कार्यक्रमात हजेरी लावली होती.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार सलमानला मिळणाऱ्या या धमक्यांबद्दल नुकतंच अभिनेत्री कंगना रणौतने भाष्य केलं आहे. सलमानला मिळालेल्या सुरक्षेवरुन तिने देशाच्या सुरक्षेबद्दल वक्तव्य केलं आहे. या धमक्यांमुळे घाबरून जायची काहीही गरज नाही असंही कंगना म्हणाली.
आणखी वाचा : राजामौली यांना सिंधू संस्कृतीवर करायचा होता चित्रपट; पाकिस्तानने आडकाठी केल्याने स्वप्नं राहिलं अपूर्ण
कंगना म्हणाली, “आम्ही अभिनेते आहोत. सलमान खानला केंद्राकडून सुरक्षा देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी ही सुरक्षा देऊ केली आहे त्यामुळे घाबरायचे कारण नाही. जेव्हा मला धमक्या मिळाल्या होत्या तेव्हा मलाही सुरक्षा देण्यात आली होती. सध्या आपल्या देशाची सुरक्षा उत्तम लोकांच्या हातात आहे, त्यामुळे काहीही काळजी करायची आवश्यकता नाही.”
कंगनाने नुकतीच हरिद्वारला भेट दिली आणि तिथे होणाऱ्या गंगा आरतीला हजेरीही लावली. नुकताच सलमान खान दुबईला गेला होता. त्यावेळी आलेल्या अनुभवाबद्दल सलमान म्हणाला की, “मी जिथे जातोय तिथे मला पूर्ण सुरक्षा दिली जात आहे. आता इथे दुबईत असताना त्याची काहीच गरज भासत नाही. इथे मी पूर्णपणे सुरक्षित आहे. भारतामध्ये थोडी समस्या आहे. शेवटी जे व्हायचं आहे ते होणारच आहे. माझ्या आजूबाजूला असलेली शस्त्रधारी माणसं पाहून मला आता थोडी भीती वाटायला लागली आहे.”