दमदार अभिनय व विविधांगी भूमिका साकारुन बॉलिवूडमध्ये स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. पत्नी आलियाने नवाजुद्दीनवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. नवाजुद्दीन व त्याच्या कुटुंबियावर छळ केल्याचा आरोप आलियाने केला आहे. त्याबरोबरच नवाजुद्दीनवर बलात्कार आणि प्रसिद्धी व पैशाचा गैरवापर करत असल्याचा आरोपही आलियाने केला आहे. नवाजुद्दीन व आलियामधील वाद विकोपाला गेल्यानंतर अभिनेत्याने यावर मौन सोडत पहिल्यांदाच भाष्य केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवाजुद्दीनने त्याच्या सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर केली होती. “आतापर्यंत शांत राहिलो म्हणून मी वाईट माणूस आहे अशी माझ्यावर टीका करण्यात आली. हा तमाशा माझ्या मुलांना कधीतरी कळणारच या कारणामुळे मी शांत होता. सोशल मीडिया, प्रसारमाध्यमं आणि काही लोकं माझ्या खराब प्रतिमेचा आनंद घेत आहेत. मी तुम्हा सगळ्यांना काही गोष्टी सांगू इच्छितो. गेल्या काही वर्षांपासून मी व आलिया एकत्र राहत नाही. आमचा आधीच घटस्फोट झाला आहे. पण आम्ही मुलांसाठी समजुतदारपणाने वागलो”, असं नवाजुद्दीनने म्हटलं आहे. याशिवाय प्रत्येक महिन्याला आलियाला १० लाख रुपये देत असल्याचंही त्याने सांगितलं. नवाजुद्दीनने त्याची बाजू स्पष्ट केल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने या प्रकरणावर भाष्य केलं आहे.

हेही वाचा>> “दर महिन्याला तिला १० लाख रुपये पोटगी देतो”, नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आरोपांवर पत्नी आलियाची प्रतिक्रिया, म्हणाली “पुराव्यांसह…”

कंगनाने नवाजुद्दीनचं ट्वीट रिट्वीट केलं आहे. “गप्प राहिल्यामुळे आपल्याला शांतता मिळते असं नाही. नवाजुद्दीन साहेब तुमचे अनेक चाहते व हितचिंतक आहेत, ज्यांना या प्रकरणात तुमची बाजूही जाणून घ्यायची आहे”, असं कंगनाने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. नवाजुद्दीनच्या प्रकरणावर कंगनाने केलेलं हे ट्वीट चर्चेत आहे. कंगना सोशल मीडियावर सक्रिय असून समाजातील अनेक घडामोडींवर परखडपणे तिचं मत मांडताना दिसते.

हेही वाचा>> घटस्फोटानंतर नवाजुद्दीन सिद्धीकीचे पूर्वाश्रमीच्या पत्नीबाबत धक्कादायक खुलासे, म्हणाला, “पैसे हवे आहेत म्हणून…”

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आरोपांनंतर पत्नी आलियाने प्रतिक्रिया दिली आहे. नवाजुद्दीनची पोस्ट आलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केली आहे. “यामागील सत्य पुराव्यांसह मी लवकरच तुमच्या समोर आणेन. वेट अॅण्ड वॉच”, असं आलियाने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. आलिया व नवाजुद्दीनने २०१० साली लग्न केलं होतं. त्यांना दोन मुलं आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kangana ranaut supports nawazuddin siddiqui said silence doesnt always give us peace kak