बॉलिवूड बिनधास्त आणि बेधडक अभिनेत्रींपैकी एक म्हणजे कंगना रणौत. ती सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. समाजातील किंवा बॉलीवूडमधील तिला न पटणाऱ्या गोष्टींबद्दल ती अगदी स्पष्टपणे भाष्य करत असते. आतापर्यंत अनेकदा तिने तिच्या पोस्टमधून बॉलीवूड स्टार्सना लक्ष केलं आहे. तर आता पुन्हा एकदा तिने एक मोठी पोस्ट शेअर करत आघाडीच्या अभिनेत्यावर टीका केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून बॉलीवूडमध्ये अनेक ऐतिहासिक आणि पौराणिक चित्रपट प्रदर्शित होत आहेत. सध्या ‘आदिपुरुष’ चित्रपटाची सर्वत्र चर्चा असताना नितेश तिवारी यांनी काही दिवसांपूर्वी रामायणावर आधारित चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर श्रीरामांच्या भूमिकेत दिसणार आहे, तर अभिनेत्री आलिया भट्ट या चित्रपटामध्ये सीतेची भूमिका साकारणार आहे. पण आता या कास्टिंगवर कंगनाने जोरदार टीका केली आहे.
कंगनाने एक इंस्टाग्राम स्टोरी शेअर करत लिहिलं, “अलीकडेच रामायण चित्रपट येत असल्याची बातमीने ऐकली. या चित्रपटात एक हडकुळा पांढरा उंदीर (तथाकथित अभिनेता) ज्याला थोड्या समजुतीची गरज आहे. जो पीआरच्या मदतीने बॉलीवूडमधील जवळजवळ प्रत्येक व्यक्तीबद्दल वाईट गोष्टी पसरवतो. अमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेसाठी ओळखला जाणारा हा अभिनेता भगवान शंकराच्या ट्रायोलॉजीमध्ये (ज्याला कोणीही पाहिलं नाही किंवा याचे पुढील भाग पाहण्यासाठी इच्छुक नाहीत) स्वतःला सिद्ध करण्याचा आटोकाट प्रयत्न केल्यानंतर आता श्रीरामांची भूमिका साकारणार आहे.”
पुढे तिने लिहिलं, “तर दुसरीकडे, एक तरुण दाक्षिणात्य सुपरस्टार जो स्वतःच्या मेहनतीने इथवर पोहोचला आहे, एक फॅमिली मॅन, एक परंपरावादी, वाल्मिकीजींच्या वर्णनानुसार जो श्रीरामांसारखा दिसतो त्याला रावणाची भूमिका मिळते. हे काय कलियुग आहे? फिकट दिसणारा ड्रग्ज घेणाऱ्या मुलाने भगवान रामाची भूमिका करू नये. जय श्री राम.” आता तिचीही इंस्टाग्राम स्टोरी सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.