सध्या शाहरुख खान व दीपिका पदुकोणच्या ‘पठाण’ चित्रपटाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच २४ कोटींपेक्षा अधिक कमाई केली असल्याची चर्चा आहे. दरम्यान हा चित्रपट येत्या काही दिवसांमध्ये रेकॉर्डब्रेक कमाई करणार असल्याचं बोललं जात आहे. आता ‘पठाण’ची हवा असताना कंगना रणौतने केलेलं ट्वीट चर्चेचा विषय ठरत आहे.
आणखी वाचा – Video : शाहरुख खानच्या ‘पठाण’मधील सलमान खानचा ‘तो’ सीन लीक, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
कंगना प्रत्येक विषयावर तिचं मत अगदी स्पष्टपणे मांडते. आता तिने ट्विटरवर पुन्हा पुनरागमन केलं आहे. मध्यंतरी एका ट्विटमुळे तिला ट्विटरला रामराम करावा लागला होता. पण आता पुन्हा ट्विटरवर परतल्यानंतर तिने बॉलिवूडला उद्देशून केलेलं ट्विट चर्चेत आलं आहे.
काय म्हणाली कंगना रणौत?
“चित्रपटसृष्टी इतकी मुर्ख आहे की, कोणताही केलेला प्रयत्न, निर्मिती किंवा कला किती यशस्वी ठरली हे सांगण्यासाठी फक्त किती रुपये कमावले हे दाखवलं जातं. कलेचा दुसरा काहीच हेतू नाही असं भासवलं जातं. चित्रपटसृष्टीचा दर्जा किती घसरला आहे? हे यामधून दिसून येतं.”
पुढे कंगना म्हणाली, “कलेचा जन्म मंदिरांमधून झाला आहे. त्यानंतर ही कला चित्रपटगृहांपर्यंत पोहोचली. चित्रपटसृष्टी फक्त व्यवसाय करण्यासाठी निर्माण करण्यात आलेली नाही. फक्त कोटींमध्ये कमाई करण्यासाठी चित्रपटसृष्टी नाही. म्हणून नेहमीच कलेचा आदर केला जातो कोणत्याही व्यवसायाचा नाही.” मात्र कंगनाने हे ट्वीट करत असताना कुठेही ‘पठाण’ चित्रपटाचा उल्लेख केलेला नाही.