काही महिन्यांपूर्वी एलॉन मस्कने ट्विटर कंपनीचे बहुंताश शेअर्स विकत घेतले. गुरुवारी त्याचा करार पूर्ण झाला आणि त्याला कंपनीच्या मालकीचे अधिकार मिळाले. ट्विटरचे अधिकार मिळताच त्याने सीईओ पराग अग्रवाल, कायदा विभागाचे प्रमुख विजया गड्डे आणि मुख्य वित्तीय अधिकारी नेड सेगल यांना पदावरुन हटवले. यामागे कंपनीबाबत दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झाल्याचे कारण देण्यात आले. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार भविष्यात ट्विटरमधील अन्य कर्मचाऱ्यांची देखील हकालपट्टी होऊ शकते. सध्या या घटनेवर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरु आहे.

मे २०२१ मध्ये द्वेषपूर्ण वक्तव्य आणि अपमानास्पद वर्तनणूकीसंबंधित ट्विटरच्या कायद्यांचे सतत उल्लंघन केल्यामुळे अभिनेत्री कंगना रणौतचे ट्विटर अकाऊंट सस्पेन्ड करण्यात आले होते. त्याआधी ती ट्विटरवर फार सक्रिय होती. या माध्यमावर ती बेधडकपणे व्यक्त व्हायची. ट्विटर अकाऊंट निलंबित झाल्याने तिने अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा आधार घेतला. आज एलॉन मस्कने घेतलेल्या निर्णयाचे तिने स्वागत केले आहे. तिने इन्स्टाग्रामवर काही स्टोरीज रिपोस्ट केल्या आहेत. या स्टोरीजमध्ये तिचे चाहते एलॉन मस्ककडे तिच्या अकाऊंटवरील निर्बंध हटवण्यात यावे अशी विनंती करत असल्याचे दिसते.

आणखी वाचा – “या जगात माणुसकी…”; अभिनेते नसरुद्दीन शाह यांचा डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या कामांना उजाळा

कंगनाप्रमाणे ट्रम्प यांच्यावरही ट्विटरच्या कायद्याचा भंग केल्याचा आरोप होता. एलॉन मस्ककडे मालकी हक्क जाताच त्याने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प यांचे अकाऊंटवरील निर्बंध काढण्याचे आदेश दिले. सोमवारपर्यंत त्यांच्यावर अमल होणार असण्याची घोषणाही केली. यामुळे कंगनाच्या चाहत्यांनी तिचे अकाऊंट पुन्हा सुरु करवून घेण्यासाठीचे प्रयत्न सुरु केले आहेत.

आणखी वाचा – “१०० कोटी देतो, कुत्र्याबरोबर सेक्स…”, आहाना कुमराने साजिद खानवर केले होते गंभीर आरोप

हे निर्णय घेण्यापूर्वी एलॉनने “ट्विटरची सुंदरता नागरिक पत्रकारितेच्या सक्षमीकरणामध्ये आहे. लोक कोणत्याही प्रकारचा पक्षपात न करता त्यांच्याकडची माहिती इतरांना सांगू शकतात”, असे विधान केले होते.

Story img Loader