बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. कधी बॉलिवूडवर निशाणा साधल्यामुळे तर कधी राजकीय घडामोडींवर भाष्य केल्यामुळे कंगना स्वतःकडे लक्ष वेधून घेत असते. आता कंगनाने सोशल मीडियावरून तिच्या चाहत्यांना एक महत्वाचा संदेश दिला आहे. कंगनाला साड्या खूप प्रिय आहेत. तिला मिळालेली साडी नेसण्याची संधी ती कधीही सोडत नाही. नुकतेच विमानतळावर तिला पाहण्यात आले. यावेळीही तिने साडी नेसली होती. तेव्हाचा एक व्हिडीओ तिने पोस्ट करत त्या साडीमागची गोष्ट सांगत एक महत्वाचे आवाहन केले आहे.

हेही वाचा : “सलमान खान ड्रग्ज घेतो आणि शाहरुख तर…”, योगगुरू बाबा रामदेव यांचा बॉलिवूडवर खळबळजनक आरोप

कंगनाने व्हिडीओ पोस्ट करत लिहिले, “ही साडी मी कोलकत्याहून फक्त सहाशे रुपयांना खरेदी केली होती. स्टाईल करणे म्हणजे कोणत्याही आंतरराष्ट्रीय ब्रँडचे गुलाम बनणे नाही. राष्ट्रवादी व्हा. आपल्या देशात तयार केलेल्या गोष्टींना पुढे आणा. तुमच्या प्रत्येक कृतीने आपल्या देशाला फायदा झाला पाहिजे. तुम्ही स्वदेशी वस्तूंची खरेदी केली पाहिजे. त्याने अनेकांच्या घरांना हातभार लागतो. जय हिंद!”

कंगनाने स्वदेशी वस्तूंचा प्रचार करण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही अनेकदा तिने आपल्या देशात तयार केलेल्या वस्तूंची खरेदी करण्याचे चाहत्यांना आवाहन केले होते.

आणखी वाचा : “…आणि लग्नानंतर सगळंच बदललं,” रणबीर कपूरने केला आलियाशी असलेल्या नात्याविषयी खुलासा

कंगना सध्या तिच्या ‘इमर्जन्सी चित्रपटावर काम करत आहे. या चित्रपटात ती पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तिने स्वत: या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ‘इमर्जन्सी’ चित्रपटात अभिनेता श्रेयस तळपदे, मिलिंद सोमण, अनुपम खेर यांसह अभिनेत्री महिमा चौधरी महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहे.

Story img Loader