Kangna Ranaut Interview : बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत सध्या त्यांचा नवीन चित्रपट ‘इमर्जन्सी’मुळे चर्चेत आहेत. या चित्रपटात कंगना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत असून मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे हा अटल बिहारी वायपेयी यांच्या भूमिकेत झळकणार आहे. चित्रपटाच्या निमित्ताने एका मुलाखतीत कंगना यांनी अक्षय कुमार बद्दलचा एक किस्सा सांगितला आहे. कंगना म्हणाल्या की, आतापर्यंत मोठ्या बॅनरखाली काम करण्याच्या अनेक ऑफर आल्या, मात्र मी या सगळ्याला कायमच नकार दिला. अक्षय कुमार, सलमान खान आणि संजय लीला भन्साळी यांनी मला अनेकदा त्यांच्या चित्रपटात काम करण्यासाठी विचारणा केली होती. मात्र, मी सगळ्यांना ठामपणे नकारच दिला.

‘एनबीटी’ एंटरटेनमेंटला दिलेल्या मुलाखतीत कंगना रणौत यांनी अक्षय कुमार बरोबरची एक आठवण सांगितली आहे. कंगना म्हणाल्या की, अक्षयने ‘सिंह इज ब्लिंग’ या चित्रपटातील भूमिकेसाठी मला विचारलं होतं, त्यावेळी मी अक्षयला चित्रपटात काम करण्यासाठी नकार दिला. तेव्हा अक्षयने माझ्या या निर्णयाचा आदर केला होता. त्यानंतर देखील अक्षयने मला त्यांच्या नव्या चित्रपटांसाठी विचारलं होतं, मात्र तेव्हाही मी माझ्या नकारावर ठाम होते. मी सतत नकार देत असल्याने अक्षयने याबाबत मला नकाराचं कारण विचारलं. अक्षय म्हणाला की,”तुम्ही माझ्या प्रत्येक चित्रपटाला नकार का देत आहात? तुम्हाला माझ्याबरोबर काम करण्यात काही अडचणी आहेत का?” तेव्हा मी त्याला सांगितलं की, “तू मला समजून घे. चित्रपटातील जी भूमिका करण्यासाठी तू मला ऑफर देत आहेस, त्या भूमिकेला स्वत:चं असं अस्तित्त्व आहे का? तुम्हालासुद्धा एक मुलगी आहे. या देशातच नाही, तर चित्रपटातसुद्धा मी महिलांना सन्मान मिळावा हीच अपेक्षा करते”.

Shah Rukh Khan Rejected Karan Arjun
‘या’ कारणामुळे शाहरुख खानने ‘करण अर्जुन’ करायला दिला होता नकार, आमिर खानची लागली होती वर्णी, पण…
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
aishwarya rai and abhishek bachchan
“सेटवर आम्ही कधीच त्यांना…”, ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनबाबत अभिनेता म्हणाला, “त्यांच्या नात्यामुळे…”
parveen babi kabir bedi break up story
“परवीन बाबीने मला सोडलं, कारण मी तिला…”, कबीर बेदी यांचा मोठा दावा; म्हणाले…
salman khan reacted on aishwarya rai abhishek bachchan marriage
ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनशी लग्न केल्यानंतर सलमान खान म्हणालेला, “माझ्या आयुष्याचा एक…”
savita malpekar bald look in kaksparsh praises Mahesh Manjrekar
“महेशने विचारलं टक्कल करशील का? मी लगेच…”, सविता मालपेकरांनी सांगितला ‘काकस्पर्श’चा किस्सा, म्हणाल्या…
aamir give advice to kiran rao to be nice wife
घटस्फोटानंतर चांगली जोडीदार होण्यासाठी सल्ला देणाऱ्या आमिर खानला किरण राव म्हणाली, “मी…”
Shah Rukh Khan
“शूटिंगच्या पहिल्या दिवशी तो माझ्याकडे आला अन् म्हणाला….”, बॉलीवूड अभिनेत्रीने शाहरुख खानबद्दल केलं वक्तव्य चर्चेत

हेही वाचा – कंगना रणौत यांना ‘संजू’ चित्रपटात काम करण्याची मिळाली होती संधी; म्हणाल्या, “रणबीर कपूर स्वतः माझ्या घरी आला अन्…”

‘हे’ होतं नकार देण्याचं खरं कारण

कंगना म्हणतात की, चित्रपट हे असं माध्यम आहे, ज्यातून तुमच्या विचारांचा प्रभाव समाजावर पडत असतो. एक अभिनेत्री असण्याबरोबरच मी एक महिला देखील आहे, त्यामुळे मी अशी कोणतीही भूमिका करू शकत नाही, जी महिलांना दुय्यम दर्शवते. कंगना पुढे असंही म्हणाल्या की, मी फक्त अक्षय कुमारच्या चित्रपटांनाच नाही तर सलमान, रणबीर आणि संजय लीला भन्साळी यांनी ऑफर केलेल्या व्यक्तिरेखांना देखील नकारच दिला होता.

हेही वाचा – इंदिरा गांधींच्या आयुष्यातून खूप काही शिकण्यासारखं! अभिनेत्री दिग्दर्शक कंगना राणावतचे मत

कंगना यांनी मुलाखतीत सांगितलं की, संजय लीला भन्साळी यांनी देखील मला त्यांच्या चित्रपटात ‘आयटम साँग’ची ऑफर दिली होती, तेव्हा देखील मी त्यांना माझा होकार नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं. याचबरोबर सलमान खानने देखील ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटातील भूमिकेसाठी विचारलं होतं, त्यावेळी देखील मी सलमानला नकार दिला. त्यानंतर ती भूमिका करिना कपूरने साकारली. पुढे त्याने मला ‘सुलतान’ चित्रपटासाठी देखील ऑफर दिली होती, तेव्हाही मी त्याला नाही म्हटलं. तेव्हा सलमान निराश होत म्हणाला की, यापेक्षा अजून वेगळं काय अपेक्षित आहे तुम्हाला? पुढे कंगना रणौत म्हणतात की, असं असलं तरी सलमान खान माझ्यावर रागावला नाही. तो खूप प्रेमळ आणि दयाळू आहे. जेव्हा जेव्हा तो नवीन चित्रपटाची निर्मिती करतो, तेव्हा तेव्हा तो मला काम करण्यासाठी विचारतो आणि मी नकारच देते. जेव्हा सलमान खान यांना समजलं की, ‘इमर्जन्सी’ चित्रपटात मी मुख्य भूमिका साकरत आहे, तेव्हा त्याने मला सांगितलं आहे की, हा चित्रपट तो माझ्यासाठी आवर्जून पाहणार आहे; असं कंगना रणौतने एका मुलाखतीत सांगितलं आहे.