बॉक्स ऑफिसवर सध्या हिंदी चित्रपटांपेक्षा चर्चा आहे ती दाक्षिणात्य चित्रपटांची, नुकताच प्रदर्शित झालेला ‘कांतारा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. ‘पुष्षा’, ‘केजीएफ’ यांच्या पाठोपाठ अभिनेता ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा’ चित्रपट ३० सप्टेंबरला कन्नड व मल्याळम भाषेमध्ये प्रदर्शित झाला. तर १४ ऑक्टोबरला हा चित्रपट हिंदीमध्ये प्रदर्शित झाला.कन्नड चित्रपटसृष्टीसाठी हा मोठा रेकॉर्ड आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची अधिकाधिक पसंती मिळताना दिसत आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने १.२७ कोटीचा गल्ला जमवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या चित्रपटातील अभिनेता ऋषभ शेट्टी सध्या चर्चेत आहे. या चित्रपटातून त्यांच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. ऋषभ शेट्टी मुलाखतीत असं म्हणाला की ‘३ ते ४ महिने मी बॉलिवूड चित्रपटसृष्टीत काम केले आहे. त्यामुळे माझी हिंदी चांगली आहे. २००६ साली प्रदर्शित झालेला ‘सायनाइड’ हा माझा पहिला कन्नड चित्रपट. त्यानंतर मी ‘मर्ड’र या बॉलिवूडच्या कन्नड रिमेकमध्ये काम केलं. त्यानंतर माझ्याकडे काम नव्हते. त्यानंतर मला एका हिंदी चित्रपटाच्या सेटवर लोकल कोऑर्डिनेशनच काम मिळालं होत. त्यानंतर मी ऑफिस बॉय, कधी निर्मात्याच्या ड्रायव्हरच काम केले आहे. मला संकलनाची आवड होती. मला सांगण्यात आलं की आम्ही तुला चांगल्या संकलकाकडे पाठवू पण मला माहित होत तिकडेदेखील मला हेच काम करावं लागेल. कुठल्या ही ज्येष्ठ संकलकाकडे गेलं हे काम करावेच लागते. मला असं लक्षात आले की आपले करियर काही होणार नाही आपण गावाला निघून जावे. म्हणून मी माझ्या गावी परतलो’.

“बघावं तेव्हा तुझी कंबर… “सतत ‘सामी सामी’ गाण्यावर थिरकणाऱ्या रश्मिका मंदानावर नेटकरी वैतागले

तो पुढे म्हणाला की कांताराचे चित्रीकरण माझ्या गावात केले आहे. मी काही कन्स्ट्रक्शन साईटवर काम केले आहे त्यामुळे मला चित्रपटाचा सेट लावताना झाला आहे. पिंकविलाशी बोलताना त्याने आपल्या संघर्षाबद्दल सांगितले. ‘कांतारा’ला IMDb वर १० पैकी ९.६ रेटिंग मिळाली आहे.५ ऑक्टोबरला प्रदर्शित झालेल्या सलमानच्या ‘गॉड फादर’ या तेलुगू चित्रपटालाही ‘कांतारा’ने टक्कर दिली आहे.

‘कांतारा’ हा एक अ‍ॅक्शन-थ्रिलर आहे. यात कांबळा आणि बुटा कोलाच्या पारंपारिक संस्कृतीचा उत्सवावर बेतला आहे. यात ऋषभ दुहेरी भूमिकेत आहे. अनेकांनी हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट असल्याचे वर्णन केले आहे. केजीएफचे निर्माते होंबळे फिल्म्स अंतर्गत विजय किरगंडूर यांनी याची निर्मिती केली आहे.