Mamta Kulkarni Returns to Mumbai : ९० च्या दशकात आपल्या अभिनयाने व सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री मराठमोळी अभिनेत्री ममता कुलकर्णी तब्बल २५ वर्षांनी मुंबईत परतली आहे. ‘करण अर्जुन’ फेम अभिनेत्रीने मुंबईत आल्यावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिने मुंबईत परत आल्यानंतरच्या तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ममता कुलकर्णीने २००० साली देश सोडला होता. त्यानंतर ती एकदा भारतात आली होती; मात्र आता तब्बल २५ वर्षांनी मुंबईत परतल्यावर तिने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिने तिचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये तिने फ्लाइट लँड होताच विमानात उंचावरून भारताला पाहून भारावून गेले असं म्हटलं आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बाहेर पडताना डोळ्यात अश्रू होते, असं ममता म्हणाली.

हेही वाचा – प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलाला ड्रग्ज प्रकरणात अटक

ममताने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये सांगितलं की ती २०१२ मध्ये कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी भारतात आली होती. त्यानंतर आता १२ वर्षांनी ती जानेवारीच्या शेवटी प्रयागराजमध्ये होणाऱ्या पवित्र कुंभमेळ्यासाठी पुन्हा देशात परतली आहे. १२ वर्षांनी भारतात आणि २५ वर्षांनंतर मुंबईत आल्याचं ममताने तिच्या पोस्टमध्ये सांगितलं.

हेही वाचा – पैसे देऊन अंत्यसंस्काराला बोलावलं, रडल्यास मानधन वाढवून देण्याची कुटुंबाची ऑफर अन्…; बॉलीवूड अभिनेत्याचा खुलासा

पाहा व्हिडीओ –

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, २०१५ मध्ये अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात ममता कुलकर्णीचं नाव आलं होतं. त्यानंतर ती भारतातून निघून गेली होती. २००० हजार कोटी रुपयांच्या प्रकरणात ममता व तिचा पती विकी गोस्वामी यांची नावं आली होती. दोघांचा या प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप झाला होता. गंभीर आरोप असूनही, ममताला अटक झाली नव्हती. अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयाने तिला क्लीन चिट देत तिच्याविरुद्धची तक्रार रद्द केली आहे. त्यानंतर ती आता मुंबईत परत आली आहे.

रेखा अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ शोबद्दल म्हणाल्या, “मला विचार…”

या ड्रग्ज प्रकरणात नाव आल्याने ममता कुलकर्णीच्या करिअरवर मोठा परिणाम झाला. ५२ वर्षांच्या ममताने ९० च्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं होतं. ‘नसीब’, ‘बाजी’, ‘करण अर्जुन’, ‘आंदोलन’, ‘वक्त हमारा है’, ‘सबसे बडा खिलाडी’, ‘घातक’, ‘क्रांतीवीर’, ‘छुपा रुस्तम’ हे तिचे गाजलेले चित्रपट आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karan arjun actress mamta kulkarni returns to mumbai after 25 years 2000 crore drug case hrc