Karan Arjun Re-Release : सलमान खान आणि शाहरुख खान एकाच फ्रेममध्ये झळकणं ही दोघांच्या चाहत्यांसाठी खूप मोठी गोष्ट असते. या दोघांना एकत्र, एकाच चित्रपटात पाहण्याची बॉलीवूडप्रेमी आतुरतेने वाट पाहत असतात. अलीकडेच ‘पठाण’, ‘टायगर 3’ या चित्रपटांमध्ये आपल्याला सलमान-शाहरुखची जोडी एकत्र स्टंट परफॉर्म करताना दिसली होती. पण, आता हे ‘करन-अर्जुन’ चित्रपटगृह पुन्हा एकदा गाजवण्यासाठी तब्बल ३० वर्षांनी परत येणार आहेत.

सध्या बॉलीवूडसह अनेक दाक्षिणात्य जुने चित्रपट पुन्हा प्रदर्शित होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ‘तुझे मेरी कसम’, ‘रहना हैं तेरे दिल मैं’, ‘जब वी मेट’ असे अनेक चित्रपट रि-रिलीज करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर आता ३० वर्षांपूर्वी ब्लॉकबस्टर ठरलेला ‘करन अर्जुन’ चित्रपट देखील पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमान खानने याबाबत अधिकृत पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

Neelam Kothari admits she wanted to kill Chunky Panday
“त्याचा जीव घ्यावासा वाटत होता”, शूटिंगदरम्यान चंकी पांडेच्या ‘त्या’ कृतीवर भडकलेली नीलम कोठारी; म्हणाली, “तो मला…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
jimi shergil career 50 flop movies
करिअरमध्ये तब्बल ५० चित्रपट झाले फ्लॉप, मात्र तरीही कोट्यवधी रुपये मानधन घेतो ‘हा’ अभिनेता
om puri and shabana azmi
“लोक जेवायला बोलवायचे तेव्हा आम्ही…”, शबाना आझमींनी सांगितला ओम पुरी यांच्याबरोबरचा किस्सा; म्हणाल्या…
Arjun Kapoor Confirms Breakup With Malaika Arora
Video: ६ वर्षांचं नातं संपलं, मलायकाचं नाव ऐकू येताच राज ठाकरेंच्या शेजारी उभा असलेला अर्जुन कपूर म्हणाला…
rajeshwari kharat fandry fame actress shares photo with somnath awaghade
‘फँड्री’तील शालू-जब्या गुपचूप लग्नबंधनात? राजेश्वरी खरातच्या ‘त्या’ फोटोवर कमेंट्सचा पाऊस; नेटकरी म्हणाले, “हे कधी झालं…”

हेही वाचा : अमिताभ बच्चन, शाहरुख-सलमान खान नव्हे तर ‘हा’ आहे एक कोटी मानधन घेणारा पहिला भारतीय अभिनेता

‘करन अर्जुन’ ‘या’ दिवशी पुन्हा प्रदर्शित होणार

“राखीजी चित्रपटात अगदी बरोबर म्हणाल्या होत्या…मेरे ‘करन अर्जुन’ आएंगे! २२ नोव्हेंबरला आम्ही पुन्हा एकदा जगभरातील सिनेमागृहांमध्ये येतोय” असं कॅप्शन देत सलमान खानने ‘करन अर्जुन’ पुन्हा प्रदर्शित होत असल्याची मोठी घोषणा केली आहे. या चित्रपटात सलमान-शाहरुखसह काजोल, ममता कुलकर्णी, राखी गुलजार, अमरिश पुरी, इला अरुण, जॉनी लिव्हर यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या.

‘करन अर्जुन’ ( Karan Arjun ) १९९५ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील गाणी, संवाद आणि विशेषत: सलमान-शाहरुखची जुगलबंदी प्रचंड गाजली होती. आता तब्बल ३० वर्षांनंतर हा सिनेमा २२ नोव्हेंबरला पुन्हा एकदा प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामुळेच सलमान-शाहरुखला बॉलीवूडचे ‘करन अर्जुन’ अशी ओळख मिळाली.

हेही वाचा : “ठाणे महानगरपालिका झोपलीये…”, कचऱ्याचा ढीग पाहून शशांक केतकर संतापला! म्हणाला, “दारूच्या बाटल्या, तंबाखू…”

चित्रपटाबद्दल ( Karan Arjun ) थोडक्यात सांगायचं झालं, तर एक आई आपल्या दोन मुलांसह म्हणजेच करन (सलमान खान) आणि अर्जुन (शाहरुख खान) यांच्याबरोबर एका गावात राहत असते. यांचे वडील गावचे ठाकूर असतात. मात्र, दुर्जन सिंग ( अमरीश पुरी ) त्यांच्या वडिलांची हत्या करतो. यानंतर या मुलांचा देखील खून करण्यात येतो. पुढे, ‘करन अर्जुन’चा पुनर्जन्म झाल्याचं चित्रपटात पाहायला मिळतं.

दरम्यान, आता ३० वर्षांनी पुन्हा प्रदर्शित झाल्यावर हा चित्रपट ( Karan Arjun ) बॉक्स ऑफिसवर काय जादू करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Story img Loader