अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओलच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. करण व द्रिशा १८ जून रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यापूर्वी त्यांचा मेहंदी सोहळा पार पडला. मेंहदी सोहळ्यात करण व द्रिशाबरोबरच सनी देओलच्या मेहंदीने लक्ष वेधून घेतले आहेत. सनीने हातावरची मेहंदी दाखवत पोज दिल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तमन्ना भाटियाने प्रेमाची कबुली दिल्यानंतर विजय वर्मा म्हणाला, “माझ्या आयुष्यात…”

देओल कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण आहे. सनीच्या मुलाच्या लग्नासाठी देओल कुटुंबीय एकत्र आले आहेत. सनी व बॉबी करणच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांमध्ये धमाल करताना दिसत आहेत. अशातच करण व द्रिशाच्या मेहंदी समारंभाचे फोटो समोर आले आहेत. याबरोबरच सनीच्या मेहंदीचे फोटोही चांगलेच व्हायरल होत आहेत.

गुरुवारी करणच्या मेहंदी सोहळ्यासाठी त्यांच्या घरी अनेक पाहुणे आले होते. पिवळ्या रंगाच्या कुर्त्यात करण खूप देखणा दिसत होता. पोज देताना करणच्या तळहातावर मेहंदीने द्रिशाचे नाव लिहिलेले दिसत होते. तर, सनीच्या तळहातावर वेगवेगळी धार्मिक चिन्हे असलेली एक अनोखी मेहंदी डिझाइन होती.

दरम्यान, सनी देओलची होणारी सून द्रिशा चित्रपटात काम करत नसली तरी ती चित्रपटसृष्टीतील कुटुंबाचा एक भाग असल्याचे बोलले जात आहे. द्रिशा प्रसिद्ध चित्रपटनिर्माते बिमल रॉय यांची पणती आहे. द्रिशा एका ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये काम करत असल्याचे सांगितले जाते.