हा चित्रपट बनवण्यासाठी अयान मुखर्जीला आठ वर्ष लागली. दरम्यान ‘ब्रम्हास्त्र पार्ट १: शिवा’ या चित्रपटाच्या बजेटवरून बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. जाहिरातींचा खर्च वगळता या चित्रपटाचे बजेट ४१० कोटी रुपये आहे असे बोलले जात होते. याबद्दल या चित्रपटाचा निर्माता करण जोहरने एका मुलाखतीत स्पष्टीकरण देत ब्रह्मास्त्रचे गणित उलगडले आहे. एका मुलाखतीमध्ये त्याने ‘ब्रम्हास्त्र पार्ट १: शिवा’ हा चित्रपट तयार करण्यासाठी ४१० कोटी वापरले नसल्याची माहिती दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : ‘पुष्पा २’मध्ये होणार ‘या’ आघाडीच्या बॉलिवूड अभिनेत्याची एंट्री, साकारणार महत्वपूर्ण भूमिका

करण म्हणाला, “‘ब्रह्मास्त्र’ ही तीन चित्रपटांची मालिका आहे आणि हे तीन चित्रपट तयार करण्यासाठी ४१० कोटी खर्च होणार आहे. तीन चित्रपटांना एकत्रित मिळून हे बजेट असल्याने या चित्रपट मालिकेच्या फक्त एका चित्रपटासाठी किती पैसे खर्च करण्यात आले हे सांगणे कठीण आहे. याचे आणखीन एक कारण म्हणजे ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात भरपूर साधनं वापरण्यात आली. तिच साधनं ‘ब्रह्मास्त्र’च्या दुसऱ्या भागात आणि त्यानंतर तिसऱ्या भागात वापरली जाणार आहेत. त्यामुळे ‘ब्रह्मास्त्र’च्या सेटमधील काही गोष्टींचा पुन्हा वापर होणार आहे.”

पुढे त्याने सांगितले, “आम्ही ‘ब्रह्मास्त्र’ने किती पैसे कमावले किंवा यावर किती खर्च झाला असा विचार आम्ही करत नाही. आम्हाला प्रेक्षकांनी ‘ब्रह्मास्त्र’च्या या जगाचा स्वीकार करायला हवा आहे. कारण यात अजून बरंच काही होणार आहे. प्रेक्षकांनी चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद दिला आणि त्यामुळे आता आम्ही याचा दुसरा आणि त्यानंतर तिसरा भाग घेऊन येणार आहोत.”

हेही वाचा : “अयान मुखर्जीला हुशार म्हणणाऱ्यांना तुरुंगात पाठवले पाहिजे…” ‘ब्रम्हास्त्र’वर कंगनाची आगपाखड

अयान मुखर्जीच्या अस्त्रवर्समधील दुसरा चित्रपट ‘ब्रह्मास्त्र पार्ट २: देव’ २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे. काही महिन्यामध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. या चित्रपटामध्ये ‘अमृता’ हे महत्त्वपूर्ण पात्र अभिनेत्री दीपिका पदुकोण साकारणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय ‘देव’ हे पात्र कोण साकारणार आहे या प्रश्नावरुन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karan johar and ayan mukerji wanted audience to accept brahmastras concept rnv