नुकतंच एका सोशल मीडिया पोस्टमधून अयान मुखर्जीने ‘ब्रह्मास्त्र २’ आणि ‘ब्रम्हास्त्र ३’बद्दलही मोठी घोषणा केली होती. कोविडनंतर सर्वाधिक कमाई करणारा ‘ब्रह्मास्त्र’ हा पहिला बॉलिवूडचा बिग बजेट चित्रपट ठरला. आता या चित्रपटाच्या पुढील भागांसाठी प्रेक्षक उत्सुक आहेत, पण ‘ब्रह्मास्त्र’चे पुढचे भाग बनणार की नाही याबद्दल शंका उपस्थित होत आहे. हे दोन्ही भाग आता बनणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

काही न्यूज पोर्टल्सच्या वृत्तांनुसार निर्माता करण जोहर आणि डिस्ने या दोघांनीही हा चित्रपट बनवण्यास नकार दिला आहे. ‘ब्रह्मास्त्र’चे पुढचे भाग बनवण्यात आता या दोघांनाही रस नाही असं सांगितलं जात आहे. एवढंच नाही तर यामुळे आता दिग्दर्शक अयान मुखर्जी त्याच्या उर्वरित भागांचे हक्क विकण्याच्या तयारीत आहे. अयानने यासाठी जिओ स्टुडिओशी संपर्क साधला आहे. जिओबरोबर मिळून तो या चित्रपटावर काम करण्याची त्याची योजना आहे.

Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
Advait kadne
‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अद्वैत कडणेने शेअर केला ‘मन्या’च्या लूकमधील फोटो; आशुतोष गोखले, अपूर्वा गोरेसह कलाकारांकडून कमेंट्सचा पाऊस
shikaayla gelo ek marathi drama review
नाट्यरंग : शिकायला गेलो एक! व्यंकूची ‘आज’ची शिकवणी
premachi goshta after tejashri pradhan exit now this actress will play mukta role
तेजश्री प्रधानने मालिका सोडल्यावर ‘प्रेमाची गोष्ट’च्या सेटवर आली नवीन ‘मुक्ता’! शेअर केला स्क्रिप्टचा पहिला फोटो…
ulta chashma
उलटा चष्मा: असला भुसभुशीतपणा नको!
varad chawan reveals shocking incident
सीनच्या नावाखाली थोबाडीत मारल्या, गाल सुजला अन्…; मराठी अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग; म्हणाला, “माझे बाबा…”

आणखी वाचा : दलाई लामांच्या ‘त्या’ वादग्रस्त व्हिडिओवर सोफिया हयातची प्रतिक्रिया; मॉडेल म्हणाली, “त्यांचा हेतू…”

अयान मुखर्जीचा जिओसह करार झाला, तर तो या चित्रपटांच्या पुढील भागांवर काम सुरू करेल. मात्र, चित्रपटाचे दिग्दर्शन अयान ऐवजी दुसरी व्यक्ती करणार असल्याचं म्हंटलं जात आहे. अयानने त्याच्या अस्त्रव्हर्समधून नंदी अस्त्र, पवन अस्त्र, गज अस्त्र आणि जल अस्त्र यांची तोंडओळख करून दिली.

‘ब्रह्मास्त्र २’ला नकार देण्याचे आणखी एक कारणही समोर आले आहे. डिस्नेचे नवे सीईओ बॉब इगर सध्या कंपनीच्या खर्चात कपात करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘ब्रह्मास्त्र’च्या उर्वरित भागांबरोबरच ते ‘मार्वल’ आणि ‘स्टार वॉर्स’चे चित्रपट आणि मालिकाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेणार असल्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

आणखी वाचा : “ॲडल्ट चित्रपट बघायला जाताना मला…” सचिन पिळगांवकरांचा कपिल शर्माच्या कार्यक्रमात मोठा खुलासा

‘ब्रह्मास्त्र २’ हा चित्रपट डिसेंबर २०२६ साली प्रदर्शित होईल तर ‘ब्रम्हास्त्र ३’ हा चित्रपट लगेचच डिसेंबर २०२७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल अशी माहिती अयानने त्याच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये दिली होती, पण आता या चित्रपटाच्या भोवती प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्टसह अमिताभ बच्चन, मौनी रॉय, शाहरुख खान हे या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत होते.

Story img Loader