करण जोहरने २८ जानेवारीला दुपारी त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली. त्यावर कमेंट सेक्शनमध्ये लोकांनी उत्तर देत त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. करणने बहुतेक प्रथमच अशा रीतीने एखाद्या चित्रपटाची घोषणा केली असल्याचं दिसत आहे. करणच्या या पोस्टची सध्या प्रचंड चर्चा होत आहे. या पोस्टमध्ये करणने चित्रपटासंबंधी तीन प्रश्न विचारले आहेत. या तीन प्रश्नांमधून करणने चांगलाच सस्पेन्स निर्माण केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं करण पोस्टमध्ये लिहितो, “ही कोणत्याही चित्रपटाची घोषणा नाही, किंवा असूही शकते जर तुम्ही मदत केलीत तर. गेल्यावर्षापासून आम्ही एका चित्रपटावर काम करत आहोत आणि याबद्दल चांगलीच गुप्तता पाळण्यात आली होती. चित्रपटाच्या दिग्दर्शकाचीच तशी मागणी होती. तर या काही हिंट आहेत ज्यावरून आम्ही नेमक्या कोणत्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत ते तुम्हाला ओळखायचं आहे. पहिली हिंट म्हणजे यात एक अत्यंत लोकप्रिय अशी अभिनेत्री आहे, दुसरी हिंट म्हणजे यात दक्षिणेतील एक मोठा सुपरस्टार आहे ज्याने नुकताच एक जबरदस्त पॅन-इंडिया सुपरहीट चित्रपट दिला आहे. तिसरी हिंट अशी की यात एक लेगसी डेब्यू अभिनेता आहे जो या इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी फार उत्सुक आहे व प्रचंड मेहनत घेत आहे.”

आणखी वाचा : शीना बोरा हत्या अन् त्यामागील गुपितं उलगडणार? नेटफ्लिक्सच्या ‘द इंद्राणी मुखर्जी स्टोरी’ या सीरिजची घोषणा

पुढे करण लिहितो, “हा चित्रपट जवळपास तयारच आहे लवकरच आम्ही तो प्रदर्शित करणार आहोत? तुमच्या मते हा चित्रपट कोणता आहे? जर तुम्ही या सगळ्यांची उत्तरं योग्य दिलीत तर चित्रपटाची एक झलक बघण्यासाठी आम्ही तुम्हाला आमंत्रित करण्यास फार उत्सुक आहोत.” करणच्या या पोस्टवर बऱ्याच कॉमेंट आल्या आहेत. मीडिया रीपोर्टनुसार करण लवकरच सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानला लॉंच करणार आहे. तर या चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारन दिसणार आहे ज्याने नुकताच ‘सालार’सारखा सुपरहीट चित्रपट दिला आहे.

करणच्या या चित्रपटाची सध्या जबरदस्त चर्चा होत आहे. ‘सरज़मीं’ असं नाव असलेल्या या चित्रपटातून सैफचा मुलगा पदार्पण करणार आहे. तर या चित्रपटाचं दिग्दर्शक बोमन इराणी यांचा मुलगा कायोज ईरानीदेखील दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे. काश्मीरच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट बेतलेला असेल. या चित्रपटाबद्दल प्रचंड गुप्तता बाळगली गेली होती अन् याबद्दल फारशी कुठेही चर्चा झालेली नाही. त्यामुळे करणचा रोख याच चित्रपटाकडे आहे असा काही लोकांचं म्हणणं आहे.

याबरोबरच करण इब्राहिम अली खानबरोबर अजून एका चित्रपटावर काम करत आहे जो ‘dharmatic’ या करणच्या नव्या ओटीटी ब्रॅंडसाठी तयार करण्यात आला आहे. हा चित्रपट थेट ओटीटीवरच प्रदर्शित होणार आहे. शौना गौतम या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. तिने याआधी ‘संजू’ व ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटांसाठी सहाय्यक म्हणून काम केलं आहे, हा तिचा पहिलाच चित्रपट असणार आहे. अद्याप या प्रोजेक्टबद्दल ही फारशी माहिती बाहेर आलेली नाही. त्यामुळे करण या दोनपैकी एका चित्रपटाबद्दलच भाष्य करत आहे असा अंदाज लावला जात आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karan johar announces film with ibrahim ali khan in a unique way by sharing a post avn