करण जोहर हा बॉलीवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून ओळखला जातो. करण नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो. बॉलीवूडमध्ये त्याचे असंख्य मित्र-मैत्रिणी आहेत. त्यामुळेच‘कॉफी विथ करण’ हा शो गेली अनेक वर्ष करण होस्ट करत आहे. या शोमध्ये बॉलीवूडचे अनेक सेलिब्रिटी हजेरी लावतात आणि करणच्या वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरं देतात. या लोकप्रिय कार्यक्रमाच्या आठव्या पर्वाला लवकरच सुरूवात होणार आहे. करणने ‘कॉफी विथ करण सीझन ८’चा नवा टीझर नुकताच प्रदर्शित केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “वर्ल्डकपच्या तिकिटांसाठी माझी मदत…”, विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी अनुष्का शर्माची ‘ती’ पोस्ट चर्चेत

करण जोहरने इन्स्टाग्रामवर टीझर शेअर करत ‘कॉफी विथ करण सीझन ८’ची घोषणा केली. हा सेलिब्रिटी टॉक शो येत्या २६ ऑक्टोबरपासून हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित करण्यात येईल. २६ ऑक्टोबरपासून या शोचे दर आठवड्याला विविध भाग प्रदर्शित केले जातील.

हेही वाचा : गिरीजा ओक आणि सई ताम्हणकर ‘अशा’ झाल्या खास मैत्रिणी; अभिनेत्री म्हणाली, “ती माझ्या आजोबांकडे…”

करणच्या नव्या सीझनची पहिली जोडी कोण असेल याची उत्सुकता सर्वांच्या मनात निर्माण झाली आहे. गेल्यावेळी आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांच्या जोडीने सातव्या पर्वाचा शुभारंभ झाला होता. यंदा कोणाला आमंत्रित करायचं हा विचार करून करण टीझरमध्ये काहीसा गोंधळलेला वाटला. तसेच प्रदर्शित झालेल्या नव्या टीझरमध्ये करण स्वत:ला ट्रोल करत असल्याचं पाहायला मिळालं. स्टारकिडस, सोशल मीडिया ट्रोलिंग, बॉलीवूड गॉसिफ, अभिनेत्यांची सेक्स लाइफ, सारखेच प्रश्न… याशिवाय यंदा दुसरं काहीतरी विचार असं करण स्वत:ला उद्देशून बोलत असल्याचं या टीझरमध्ये पाहायला मिळालं.

हेही वाचा : सुप्रिया पाठारेंच्या लेकाच्या हॉटेलमध्ये पोहोचली ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रा’तील लॉली, जेवणाचा आस्वाद घेऊन म्हणाली, “मेरे आँखों में मत झांको पर…”

टीझर पाहून ‘कॉफी विथ करण सीझन ८’बद्दल चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. सिद्धार्थ-कियारा, तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा, आदित्य-अनन्या अशा नव्या जोड्या यंदा कॉफी विथ करणमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, गेल्या सात सीझनमध्ये अनेक सेलिब्रिटी या शोमध्ये आले. त्यांनी वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले. काहींच्या वक्तव्याने वाद निर्माण होऊन अनेकांचं मोठं नुकसान झालं. पण, तरीही ‘कॉफी विथ करण’च्या नव्या सीझनची आतुरतेने वाट पाहिली जाते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karan johar announces koffee with karan season 8 and shared first teaser sva 00