बॉलिवूडमधील काही चित्रपट प्रदर्शित होऊन १५ ते २० वर्षे उलटली असली तरी आजही चाहते ते तितक्यात उत्सुकतेने पाहतात. या यादीमधील एक चित्रपट म्हणजे ‘कुछ कुछ होता है’. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. १९९८ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. करण जोहरच्या या चित्रपटातील तिन्ही पात्रे विशेष गाजली होती. या चित्रपटाच्या माध्यमातूनच करणने दिग्दर्शन क्षेत्रात पदापर्ण केलं होतं. आता करणने नुकतच या चित्रपटाबाबत मोठी घोषणा केली आहे.

हेही वाचा- अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाने नाकारली ‘रामायण’मधील लक्ष्मणाची भूमिका, जाणून घ्या कारण

sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Family recreate iconic Hum Aapke Hain Koun scene
‘गाने बैठे गाना, सामने…’ कुटुंबातील सदस्यांनी ‘हम आपके है कौन’मधील ‘ते’ गाणं केलं रिक्रिएट; VIRAL VIDEO पाहून वाजवाल टाळ्या
Zeenat Aman
‘डॉन’ नाही, तर ‘या’ चित्रपटात दिसणार होतं ‘खइके पान बनारस वाला’ गाणं पण…, झीनत अमान यांनी सांगितलेला किस्सा चर्चेत
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
Sonu Nigam
सोनू निगम कार्यक्रम सोडून गेलेल्या नेत्यांवर नाराज; म्हणाला, “हा सरस्वतीचा अपमान…”
News About Marathi Drama Urmilyan
‘उर्मिलायन’ महाकाव्यातून उलगडणार रामायणातील लक्ष्मणच्या पत्नीचं कथाख्यान, ‘या’ दिवशी होणार शुभारंभाचा प्रयोग
ankita walawalkar fiance kunal express gratitude towards dhananjay powar
“दादा लग्नाला या, जोरात कानात पिळा…”, धनंजयच्या व्हिडीओवर अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची कमेंट, आभार मानत म्हणाला…

‘कुछ कुछ होता है’ चित्रपटातील ‘तुझे याद ना मेरी आए’ या गाण्याचे रीमिक्स वर्जन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. करण जोहरने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबतची घोषणा केली आहे. करणने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कुछ कुछ होता है चे पोस्टर शेअर केलं आहे. हे पोस्टर शेअऱ करत त्याने लिहिलं “तुझे याद ना मेरी आई चे रिमिक्स लवकरच येत आहे”. तसेच पोस्टरवर वर्जन २.० असेही लिहिलं आहे.

मात्र, करणच्या या घोषणेनंतर चाहते चांगलेच नाराज झाले आहेत. अनेकांनी या पोस्टवर कमेंट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. एकाने कमेंट करत लिहिलं. “कृपया या सुंदर गाण्याला खराब करु नका.” तर दुसऱ्याने “या गण्यात नवीन काही आणू नका” अशी कमेंट केली आहे.

हेही वाचा- आमिरने जाहीर केली मुलीच्या लग्नाची तारीख, मराठमोळ्या जावयाचं कौतुक करत म्हणाला, “फिल्मी डायलॉग वाटू शकतो पण नुपूर…”

या गाण्याचे रिमिक्स वर्जन प्रसिद्ध गायक बी प्राक यांने गायले आहे. बी प्राकने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यांनी ही माहिती दिली होती. पोस्ट शेअर करत बी प्राकने लिहिले होते” जर तुम्ही मनापासून स्वप्न पाहिले तर ते स्वप्न खरे ठरते. शाहरुख खान सर, काजोल आणि राणी मुखर्जी यांच्यासाठी गाण्याचा मान मला मिळाला हे जाहीर करताना मला अतिशय आनंद होत आहे. मला आशा आहे की हे गाणे पुन्हा तयार करण्यासाठी आमची मेहनत आणि प्रयत्न तुम्हाला आवडतील.”

Story img Loader