अभिनेता शाहरुख व अभिनेत्री काजोल ही मोठ्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी आहे. त्यांचा ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हा आतापर्यंतच्या अनेक सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडते. पण, या दोघांची मैत्रीही खूप घट्ट आहे. काजोल व शाहरुख यांची मुलंही आता मोठी झाली असून तेही मित्र आहेत.
करण जोहरचा चॅट शो ‘कॉफी विथ करण’च्या एका एपिसोडमध्ये ‘कुछ कुछ होता है’चे स्टार्स म्हणजेच शाहरुख, काजोल आणि राणी यांनी हजेरी लावली होती. रॅपिड फायर राउंड दरम्यान करण जोहरने काजोलला आर्यन खान आणि निसा देवगणशी संबंधित एक प्रश्न विचारला होता. जर, आर्यन खानने जर निसा देवगणला पळवून नेलं, तर तुझी प्रतिक्रिया काय असेल, असा प्रश्न विचारल्यावर काजोलची प्रतिक्रिया खूपच मजेदार होती. हा रॅपिड फायर राउंड होता, त्यामुळे काजोलने पटकन प्रतिसाद दिला. पण गंमत म्हणजे करणने हा प्रश्न विचारल्यावर शाहरुख हसत होता.
काजोलने करणच्या प्रश्नाला लगेच उत्तर दिलं. ‘मी म्हणेन… दिलवाले दुल्हे ले जायेंगे,’ असं म्हणत काजोल हसायला लागली. व शाहरुखही हसायला लागला. पण नंतर तो म्हणाला की, या गोष्टीचा विचार करूनही त्याला टेन्शन येत आहे. “मला फक्त याचा विचार करूनही टेन्शन येतंय की काजोलशी मुलांमुळे नातं जुळेल,” असं शाहरुख म्हणाला आणि त्यानंतर राणी, काजोल आणि करण जोहरही मोठ्याने हसले होते.