बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माता करण जोहर विविध कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चेत येत असतो. करणचे ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘कल हो ना हो’, ‘काल’, ‘दोस्ताना’, ‘माय नेम इज खान’, ‘एक मैं और एक तू’ असे अनेक चित्रपट रुपेरी पडद्यावर गाजले आहेत. करण जोहरच्या दोन्ही मुलांचा आज वाढदिवस आहे. त्याची मुले शुक्रवारी आठ वर्षांची झाली. त्यामुळे मुलांच्या वाढदिवसानिमित्त त्याने सोशल मीडियावर त्यांचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करणने मुलांबरोबर सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये त्याने एक काळ्या रंगाचे स्वेटशर्ट घातलेले दिसत आहे. तर त्याची मुलगी रुहीने निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि पँट घातली आहे. तसेच मुलागा यशने लाल रंगाची पँट आणि टी-शर्ट घातला आहे. एका फोटोत त्याने दोन्ही मुलांना जवळ घेतल्याचे दिसत आहे. तर आणखी एका फोटोत त्याने रुही आणि यशला मिठी मारल्याचे दिसत आहे. काही फोटोंमध्ये यश आणि रुही एकत्र मस्ती करताना दिसत आहेत. मुलांवरील प्रेम व्यक्त करत करणने त्याच्या इन्स्टाग्रामवर हे फोटो पोस्ट केले आहेत.

मुलांची नावे रुही आणि यश का ठेवली?

या फोटोंसह त्याने सुंदर कॅप्शनही दिली आहे. “वडील होणं हे माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठं यश आहे. मी त्यांची नावं माझ्या पालकांच्या नावावरून ठेवली. याचं कारण असं की, वारसा हक्क पुढे चालवणे यापलीकडे आपल्या भावना कायम राहणंही महत्त्वाचं आहे. ते दोघेही माझं जग आहेत”, अशी पोस्ट लिहीत करणने मुलांची नावे यश आणि रुही ठेवण्यामागचे कारण सांगितले आहे.

पोस्टमध्ये पुढे त्याने मुलांना शुभेच्छाही दिल्या आहेत. “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रुही आणि यश. तुम्ही दोघेही कायम छान आणि आनंदी राहा, हीच माझी देवाकडे प्रार्थना आहे”, असे त्याने शेवटी लिहिले आहे. करणचे वडील यश जोहर यांनीही बॉलीवूडमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. २००४ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांची आठवण म्हणून करणने त्याच्या मुलाचे नाव यश ठेवले आहे. तर, करणच्या आईचे नाव हीरू जोहर, असे आहे. करणने हीरू या नावावरून मुलीचे नाव रुही, असे ठेवले आहे. करण जोहर एक सिंगल पालक आहे. फेब्रुवारी २०२१७ मध्ये त्याने सरोगसीच्या माध्यमातून यश आणि रुहीचे स्वागत केले.