काही वर्षांपूर्वी करण जोहरने ‘धडक’ या चित्रपटाची निर्मिती करून इशान खट्टर आणि जान्हवी कपूरला लाँच केलं. हा चित्रपट म्हणजे मराठीतील प्रचंड गाजलेल्या ‘सैराट’ या चित्रपटाचा रिमेक होता. आता या चित्रपटाचा पुढील भाग प्रदर्शित होणार आहे अशा चर्चा रंगल्या होत्या. अखेर करण जोहरने या चर्चांना पूर्णविराम लावला.
करण जोहर ‘धडक २’ या चित्रपटाचे निर्मिती करणार आहे आणि या चित्रपटात त्याने प्रमुख भूमिका साकारण्यासाठी जान्हवी आणि इशान खट्टरला नाही तर सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डीमरी यांना प्रमुख भूमिकेत कास्ट केलं आहे, असं बोललं जाऊ लागलं होतं. आता अखेर करणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी पोस्ट करत याबाबत भाष्य केलं आहे.
आणखी वाचा : “…पण त्याला थोडं कमी लेखलं गेलं,” करण जोहरने रितेश देशमुखसाठी केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत
त्याने एक इंस्टाग्राम स्टोरी शेअर करत लिहिलं, “जे ‘धडक २’बद्दल चर्चा करत आहेत त्यांनी लक्षात घ्या की विविध बातम्यांमध्ये लिहून येत आहे त्याप्रमाणे आम्ही म्हणजेच धर्मा प्रोडक्शन ‘धडक २’ नावाचा कुठलाही चित्रपट तयार करत नाहीयोत.” आता त्याची ही स्टोरी खूप वायरल होत आहे.
हेही वाचा : Video: सिक्युरिटी चेकिंग न करताच करण जोहर निघाला विमान पकडायला, दाराबाहेर उभ्या सुरक्षारक्षकाने केलं असं काही की…
दरम्यान करण जोहर सध्या त्याच्या आगामी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाच्या कामामध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात रणवीर सिंग आणि आलिया भट प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. तरी आज बरोबर करण जोहर लवकरच ‘कॉफी विथ करण’चा ८वा सीजन प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे.