बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर नेहमीच चर्चेत असतो. करण जोहरने १९९८ मध्ये ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटासाठी पहिल्यांदा सलमान खानसोबत काम केले होते. शाहरुख, काजोल व राणी मुखर्जी यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटात सलमानने कॅमिओ केला होता. त्यानंतर २५ वर्षांत सलमान व करणने कधीच एकत्र काम केले नाही. आता लवकरच सलमान करण जोहरच्या चित्रपटात झळकणार असल्याची चर्चा सुरू आहे. नुकतेच करण जोहरने या चर्चांवर मौन सोडत स्पष्टीकरण दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- “हा काय चित्रपट…” जेव्हा करण जोहरने काढलेले फरहान अख्तरविषयी ‘असे’ उद्गार

पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत करणने याबाबतचा खुलासा केला आहे. करण म्हणाला, “मला सलमान आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाबद्दल खूप आदर आहे. माझे वडील आणि सलमानचे वडील सलीम खान खूप चांगले मित्र होते. सलमाननं ‘कुछ कुछ होता है’मध्ये काम करण्यास होकार दिला हे मी कधीच विसरू शकणार नाही. पण, एकत्र काम करण्याबाबत मी अद्याप काहीही सांगू शकत नाही. मी याबाबत थोडा अंधविश्वासू आहे. योग्य वेळ आल्यावर मी सगळं सांगेन.”

करण पुढे म्हणाला की, कुछ कुछ होता है या चित्रपटामधील अमनच्या भूमिकेसाठी अनेक अभिनेत्यांनी नकार दिला होता. त्यानंतर मी एकदा चंकी पांडेच्या पार्टीत सलमान खानला भेटलो होतो. त्या वेळेस सलमाननं अमनची भूमिका साकारण्याची तयारी दर्शवली होती. मी त्याला चित्रपटाची पूर्ण कथा वाचून दाखवली आणि त्याला चित्रपटात छोटीशीच भूमिका साकारावी लागेल याची कल्पनाही दिली होती. तेव्हा सलमान म्हणालेला, “मला पर्वा नाही. मला तुझे बाबा खूप आवडतात. मला तुझी ऊर्जा आवडते आणि मी तुझा चित्रपट करणार.” सलमानच्या या उत्तरानंतर माझा आत्मविश्वास वाढला होता.

हेही वाचा- परीणीती चोप्रा पती राघव चड्ढांऐवजी सासरच्या ‘या’ व्यक्तीबरोबर गेली मालदिव ट्रिपला; फोटो व्हायरल

सलमानच्या चित्रपटांबाबत बोलायचं झालं, तर सलमानचा बहुचर्चित टायगर ३ हा चित्रपट १० नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सलमानबरोबर कतरिना कैफ व इमरान हाश्मी यांच्या मुख्य भूमिका आहेत. इम्रान हाश्मीने या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. हिंदीबरोबर तमीळ व तेलुगु भाषेतही हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karan johar broke his silence on reuniting with salman khan after 25 years of kuch kuch hota hai dpj