‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपट उत्तम कामगिरी करत आहे. या चित्रपटातील काही दृश्यांची खूप चर्चा आहे. यामध्ये एक सीन आहे, ज्यामध्ये रणवीर सिंह म्हणजेच रॉकी रानीच्या आईसाठी ब्रा खरेदी करतो. या सीनबाबत करण जोहरने खुलासा केला आहे. मी आईसाठी ब्रा खरेदी करतो आणि त्यात मला काहीच प्रॉब्लेम वाटत नाही, असं करणने म्हटलं आहे.

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’च्या कमाईत घट; आठवड्याभरातही १०० कोटींचा टप्पा पार करणं ठरलं कठीण

Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
ajay devgan
“तो कारमध्ये एक हॉकी स्टिक…”, रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा; अभिनेता म्हणाला, “आता मी…”
Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”
ghanshyam aka chota pudhari meets nikki arbaz
Video : निक्कीला भेटण्यासाठी मुंबईत आला घन:श्याम! अरबाजला चुकून ‘या’ नावाने मारली हाक अन्…; पुढे काय घडलं?
a young man paati goes viral on social media
“..तेव्हाच मंदिरातील माऊली प्रसन्न होईल” तरुणाची पाटी चर्चेत, VIDEO एकदा पाहाच
siddhu mussewala fans commented on borthers video
Video : सिद्धू मूसेवालाच्या आठ महिन्यांच्या भावाचं झालं अन्नप्राशन; व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले, “त्याला प्रत्येक…”

करण म्हणाला, “मी आईसाठी ब्रा विकत घेण्यासाठी जातो आणि मला त्यात कधीच अडचण वाटली नाही. पण जेव्हा मी हे केलं तेव्हा माझ्यासोबत माझे काही मित्र होते, ते घाबरले होते की मी हे काम माझ्या महिला मैत्रिणींकडून का करून घेत नाही, त्यांना आईसाठी ब्रा खरेदी का करायला लावत नाही. आणि मी विचार करत होतो, का? माझ्या आईने जर मला हे काम सांगितलंय तर मी हे करायला का दुसऱ्याला पाठवू? माझी आई आता ८१ वर्षांची आहे आणि आता जेव्हा तिला एखाद्या गोष्टीची गरज असते आणि मी अशा ठिकाणी असतो जिथे ती वस्तू असते, तेव्हा तिला हव्या त्या वस्तू मला विकत घ्याव्या लागतता. ती ब्रा असू शकते किंवा आणखी काहीही असू शकते.” या चित्रपटातील काही दृश्ये लोकांना अनकंफर्टेबल वाटू शकतात, पण तोच माझा मुद्दा होता, असंही करणने नमूद केलं.

करण जोहर पुढे म्हणाला, “माझ्यासाठी तो सीन खूपच ऑर्गेनिक होता, कारण मला माहित होतं की सगळ्यांना अनकंफर्टेबल वाटत होतं. चित्रपटात एक संवाद आहे जिथे चुरनी गांगुली म्हणते, ‘शतकांपासून स्त्रिया पुरुषांसाठी पॅन्टी घासतात आणि तुम्ही ब्राला हात लावू शकत नाही?’ या सीनवरही लोकांच्या प्रतिक्रिया येतील, याची खात्री होती.”

‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम रसिका सुनीलने खरेदी केली आलिशान कार, पाहा व्हिडीओ

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटाने आत्तापर्यंत एकूण ७३.६२ कोटींची कमाई केली आहे. २८ जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने सातव्या दिवशी ६.५० कोटींचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटात आलिया भट्ट, रणवीर सिंह, धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आझमी, क्षिती जोग यांच्या प्रमुख भूमिका आहेत.