दिग्दर्शक निर्माता करण जोहर हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. त्याच्या चित्रपटांपासून ते त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांपर्यंत सगळ्याच गोष्टीच्या चर्चा राहतात. यासोबतच त्याच्या हातांना त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यातही फार उत्सुकता असते. करण नेहमीच त्याच्या मुलांचे फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावरून चाहत्यांशी शेअर करत असतो. आज जागतिक बालदिनानिमित्त त्यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्याने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

आणखी वाचा : अभिनेत्री फातिमा सना शेख करतेय ‘या’ गंभीर आजाराचा सामना, सोशल मीडियावरून दिली माहिती

chris evans back to marvel films
‘कॅप्टन अमेरिका’ फेम अभिनेता क्रिस एव्हान्सचं मार्व्हल सिनेमात पुनरागमन; ‘या’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
myra vaikul baby brother naming ceremony
Video : मायरा वायकुळच्या लहान भावाच्या बारशाचा राजेशाही थाट! नाव ठेवलंय खूपच खास, अर्थही सांगितला
priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Pushpa 2 The Rule
‘पुष्पा २’ चित्रपट पाहताना ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; सफाई कर्मचाऱ्याला आढळला मृतदेह
Zeenat Aman
‘डॉन’ नाही, तर ‘या’ चित्रपटात दिसणार होतं ‘खइके पान बनारस वाला’ गाणं पण…, झीनत अमान यांनी सांगितलेला किस्सा चर्चेत
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”

करणला दोन मुलं आहेत, यश आणि रुही. तो नेहमीच त्याच्या मुलांसाठी काही ना काही नवीन गोष्टी करत असतो. आता आज जागतिक बाल दिनानिमित्त त्याने त्याच्या मुलांचा एक खास व्हिडीओ पोस्ट केला आहे. करण जोहरची निर्मिती असलेला ‘स्टुडंट ऑफ द इयर’ हा चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटातील ‘डिस्को दिवाने’ हे गाणं ही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. आता या चित्रपटाचं एक अनोखं व्हर्जन करणच्या मुलांनी त्याला गाऊन दाखवलं आहे.

करणे नुकताच त्याच्या सोशल मीडिया अकाउंट वरून एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत करणचा मुलगा यश ‘डिस्को दिवाने’ हे गाणं गाताना दिसत आहे. अगदी आनंदाने आणि उत्साहाने हे गाणं म्हणत असताना तो त्याचे शब्द मात्र चुकीचे म्हणतोय. यशचं गाणं ऐकून करण थोडासा गोंधळलेला दिसला. या गाण्याचे शब्द यशने बदलल्यामुळे करणे या गाण्याला ‘डिस्को दिवाने’चं नवीन व्हर्जन असं म्हटलं. त्यामुळे बाल दिनाच्या दिवशी करण्याच्या मुलांनी डिस्को दिवानेचा वेगळाच व्हर्जन जगासमोर आणलं आहे.

हेही वाचा : Bigg Boss 16: करण जोहरवर भेदभाव केल्याचा आरोप, सलमान खानकडे सूत्रसंचालन द्या; नेटकऱ्यांची मागणी

करणने शेअर केलेला हा व्हिडिओ थोड्याच वेळात सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. या व्हिडिओवर करणच्या चाहत्यांबरोबरच मनोरंजन सृष्टीतीलही अनेक जणांनी प्रतिक्रिया देत त्यांना हे नवीन वर्षं आवडल्यास सांगितलं आहे. तसंच बाल दिनाच्या सगळेजण यश आणि रुहीला शुभेच्छा देत आहेत. हे गाणं आता चित्रपटात कधी पाहायला मिळणार असा सवालही करणला काही लोकांनी विचारला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर हिट ठरत आहे.

Story img Loader