संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हीरामंडी- द डायमंड बझार’ या वेब सीरिजमध्ये ताजदार बलोचच्या भूमिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता ताहा शाह सध्या चर्चेत आहे. ताह शाहला त्याच्या करिअरमध्ये खूप स्ट्रगल करावा लागला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने त्याच्या करिअरच्या सुरूवातीच्या दिवसांची आठवण करून दिली.
सोशल कंदुराला दिलेल्या मुलाखतीत, ताहा म्हणाला, “मुंबईत ऑडिशन देण्याच्या प्रयत्नात असताना पाच-सहा महिन्यांनंतर शानू शर्माने मला बोलावले. ती मला म्हणाली, करण जोहरला या मुलीची टेस्ट घ्यायची आहे, पण तू तिच्याबरोबर येऊन टेस्ट देऊ शकतोस आणि तेव्हा करण तुला पाहू शकेल. हे ऐकताच उत्सुक होऊन मी लगेच होकार दिला.”
करणला भेटण्यासाठी त्याने त्याचं शेड्यूल अगदी फ्री ठेवलं. त्याला शानू शर्माचा फोन आला हे सांगायला की आता करण जोहरला तुला भेटण्याची इच्छा नाही. ताह शाह म्हणाला, मी माझं शूट संपवलं आणि निघालो. मी त्यांच्या इमारती खालीच होतो तेवढ्यात मला शानूचा फोन आला आणि ती मला म्हणाली, मला माफ कर ताहा, पण करणला तुला भेटायटं नाहीय.”
ताहा पुढे म्हणाला, “तेव्हा तिने मला विचारलं की मी कुठे आहे. पण मी तिला म्हणालो की मी खूप दूर आहे. मी तेव्हा रिक्षा पकडली आणि परत गेलो. तेव्हा माझं मन खूप दुखावलं गेलं होतं कारण ते मला म्हणाले की, करणला तुला अजिबात भेटायचं नाही आहे.”
हेही वाचा… “सूसेकी…”, सुकन्या मोनेंना पडली ‘पुष्पा-२’ च्या गाण्याची भुरळ, व्हिडीओ व्हायरल
या घटनेबद्दल सांगताना ताह शाहने प्रोजेक्टचं नाव उघड केलं नसलं तरी यश राज फिल्म्स (YRF)च्या ‘लव्ह का द एंड’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केल्याचा उल्लेख केला. तसंच, ताहा शाह धर्मा प्रॉडक्शनच्या ‘गिप्पी’ या चित्रपटातदेखील झळकला होता.
हेही वाचा… “नजर लागणार अशी…”, ‘ठरलं तर मग’ फेम केतकी पालवचा ‘तो’ व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले…
दरम्यान, ताह शाहच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ताहा शाहने याआधी ‘लव्ह का द एंड’सह ‘बार बार देखो’, ‘कब्जा’ अशा अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तर ‘हीरामंडी : द डायमंड बझार’ ही वेब सीरिज ब्रिटीश राजवटीविरुद्धच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीदरम्यान लाहोरमधील हीरामंडीच्या रेड-लाइट जिल्ह्यातील तवायफांच्या (वेश्यांच्या) जीवनावर आधारित आहे.