चित्रपट निर्माता करण जोहर त्याच्या चित्रपटांबरोबरच फॅशन आणि लूक्समुळे नेहमी चर्चेत असतो. ‘कॉफी विथ करण’मध्ये करणच्या स्पष्टवक्तेपणाचा अनुभव अनेक कलाकारांना आला आहे. परंतु आजकाल बॉलीवूड इंडस्ट्रीमधला लोकप्रिय ‘केजो’ त्याचं परखड मत सोशल मीडियावर शेअर करत असतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकतीच त्याने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. ही स्टोरी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. एका प्रतिष्ठित वाहिनीवरील कॉमेडी शोने करणची नक्कल करत त्याचा अपमान केला आहे, याबद्दल त्याने आपलं मत मांडलं आहे.

हेही वाचा… “झी मराठीचीच मालिका करेन”, ‘या’ अभिनेत्रीचं झालं स्वप्न साकार; म्हणाली…

करणने त्याच्या सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत लिहिलं, “मी माझ्या आईबरोबर बसून टिव्ही बघत होतो आणि एका प्रतिष्ठित चॅनलवर मी एका नामांकित रिअ‍ॅलिटी कॉमेडी शोचा प्रोमो पाहिला. त्यात एक कॉमेडी स्किट होतं ज्यात ते माझी नक्कल करत होते. त्यांनी अत्यंत वाईट नक्कल केली. ट्रोलर्स आणि निनावी लोकांकडून मी अशी अपेक्षा करू शकतो परंतु जेव्हा तुमचीच इंडस्ट्री अशा व्यक्तीचा अनादर करते जो व्यक्ती २५ वर्षांपासून या इंडस्ट्रीत आहे, तेव्हा काळानुसार सगळ्या गोष्टी आपोआप उघड होतात. यामुळे या गोष्टीचा मला राग नाही आला पण मला याचं खूप वाईट वाटलं.”

हेही वाचा… “माझ्या आईने त्याला खूप झापलं होतं”, ‘सारेगमप लिटील चॅम्प्स’ फेम रोहित राऊतला ओरडली होती जुईलीची आई; गायकाने सांगितला सासूबाईंचा किस्सा

करणने शेअर केलेल्या या स्टोरीनंतर एकता कपूरने त्याची बाजू मांडत स्टोरी रिपोस्ट केली. तिने याला कॅप्शन देत लिहिलं, “हे कॉमेडी शोमध्ये अनेकदा होतं. कधीकधी शोमध्ये आणि अवॉर्ड्सच्या कार्यक्रमातदेखील खूप वाईट विनोद केले जातात. हे सगळं करून तुम्ही त्या ठिकाणी हजेरी लावावी अशी ते अपेक्षा करतात.”

दरम्यान, करणच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, करण जोहरचा ‘योद्धा’ चित्रपट १५ मार्चला प्रदर्शित झाला. यात सिद्धार्थ मल्हेत्राने मुख्य भूमिका साकारली होती. तसेच सारा अली खान अभिनीत ‘ए वतन मेरे वतन’ स्वातंत्र्यसैनिक उषा मेहता यांच्या जीवनावर आधारित असलेला चित्रपट २१ मार्च रोजी अ‍ॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला.

हेही वाचा… प्रेमात पडलेल्या शाहिद कपूरची ‘या’ दोघींनी केलेली फसवणूक; अभिनेता म्हणाला…

करण जोहरचा आगामी चित्रपट ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांची जोडी पाहायला मिळणार आहे. तर, आलिया भट्ट अभिनीत ‘जिगरा’ चित्रपटही लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karan johar felt sad when famous comedy show disrespects him by doing his mimicry dvr