करण जोहरला सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंग आणि नकारात्मकतेविषयी भाष्य करण्यात कधीच संकोच वाटत नाही. बऱ्याचदा तो या ट्रोलर्सना योग्य त्या शब्दांत सुनावत असतो. नुकतंच दीपिका आणि रणवीरच्या ‘कॉफी विथ करण’मधील एपिसोडमुळे होणाऱ्या ट्रोलिंगलाही त्याने चोख उत्तर दिलं होतं. यावेळीही त्याने असेच काही केले. सोशल मीडियावरील एका युझरने करण जोहरला आईसाठी टाइमपास म्हणून सुनेला घरी आणण्याचा खोचक सल्ला दिला, ज्यावर करण संतापला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

करणने इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत या ट्रॉलर्सचा चांगलाच समाचार घेतला. करणला या युझरची ही वागणूक पटलेली नसल्याने त्याने त्याला त्याच्याच शब्दांत उत्तर द्यायचं ठरवलं. करणच्या म्हणण्यानुसार सून म्हणजे टाइमपाससाठीची वस्तु नाही. याच गोष्टीचं स्पष्टीकरण देत करणने त्या युझरला सडेतोड उत्तर दिलं आहे.

आणखी वाचा : राजकुमार राव व दुल्कर सलमानच्या गाजलेल्या ‘गन्स अँड गुलाब्स’च्या दुसऱ्या सीझनची घोषणा; टीझर आला समोर

करण आपल्या पोस्टमध्ये लिहीतो, “मी माझ्या खासगी आयुष्यात केलेल्या निवडीवरून ट्रोल करणारे आणि मला शिव्या देणाऱ्यांपेक्षा मला हे ट्रोलर्स जास्त भयानक वाटतात. सर्वप्रथम कोणतीही सून कोणत्याही सासूसाठी टाइमपास असू शकत नाही. सुनेला नेमका कसा वेळ घालवायचा आहे हा तिचा सर्वस्वी वैयक्तिक प्रश्न आहे. याबरोबरच मला एक गोष्ट सांगायला आवडेल की माझी आई माझ्या मुलांचा अन् माझाही अत्यंत उत्तमरित्या सांभाळ करते त्यामुळे तिला कोणत्याही ‘टाइम पास’ची गरज नाही.”

फोटो : सोशल मीडिया

पुढे करण म्हणतो “ज्यांना कुणाला माझ्या नातेसंबंधाबद्दल चिंता वाटते त्यांनी एक गोष्ट ध्यानात ठेवावी ‘सून’ आणून ती समस्या दूर होणारी नाही. माझ्या आईने मला आणि माझ्या मुलांना योग्य मार्गदर्शन दिलं आहे ज्याचा आम्हाला अभिमान आहे. आणि भविष्यात माझ्या आयुष्यात कुणी एखादा जोडीदार आलाच तर मी त्याला माझ्या आयुष्यातील रितेपणा दूर करायला आधी सांगेन.” करणचं हे उत्तर सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आहे. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातून यंदा करणने ८ वर्षांनी दिग्दर्शनात कमबॅक केला. आता लवकरच सलमानबरोबरच २५ वर्षांनी एका प्रोजेक्टवर काम करणार असल्याची चर्चा आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karan johar gets angry when social media user asks him to bring daughter in law for his mother avn