करण जोहरला बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून ओळखले जाते. ९० च्या दशकातील त्याने दिग्दर्शित केलेल्या कौटुंबिक चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. बॉलीवूडच्या या यशस्वी दिग्दर्शकाला कधीकाळी शाळेत असताना अनेक संघर्षांचा सामना करावा लागला होता. शालेय जीवनात करणची चेष्टा केली जायची त्यामुळे अनेक वर्ष तो नैराश्येत होता. अलीकडेच ‘बी अ मॅन यार’ या शोमध्ये दिलेल्या मुलाखतीत करण जोहरने वैयक्तिक आयुष्याबाबत खुलासा केला आहे.
करण जोहर म्हणाला, “शाळेत दहावीत असताना मी एका मुलीवर प्रेम असल्याचं नाटक केलं होतं. त्या मुलीचं नाव शलाका होतं. आजकाल आपण गे, फॅग, होमो ( समलैंगिकता ) असे अनेक शब्द वापरून एखाद्याचा अपमान करतो. तसं त्याकाळी मला पॅन्सी म्हटलं जायचं. त्या शब्दामुळे मी अनेक वर्ष नैराश्येत होतो, मला मानसिक त्रास होत होता. शालेय जीवनात माझी चेष्ठा केली जायची. “
हेही वाचा : छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना चिन्मय मांडलेकर करतो ‘अशी’ तयारी; पाहा पडद्यामागचा व्हिडीओ
“इंडस्ट्रीत शाहरुख खान हा पहिला होता, ज्याने कधीच मला कमीपणाची किंवा अपमानास्पद वागणूक दिली नाही. त्याने नेहमीच मला पाठिंबा दिला.” असं करण जोहर शाहरुखचे कौतुक करत म्हणाला. दरम्यान, दिग्दर्शक म्हणून करण जोहरला या इंडस्ट्रीमध्ये नुकतीच २५ वर्ष पूर्ण झाली आहेत.
हेही वाचा : शाहरुखचा ‘जवान’ पहिल्याच आठवड्यात कमावणार ४०० कोटी; प्रसिद्ध अभिनेत्याची भविष्यवाणी
करणच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. आलिया भट्ट, रणवीर सिंह यांच्याशिवाय या चित्रपटात दिग्गज अभिनेत्री जया बच्चन, अभिनेते धर्मेंद्र, शबाना आझमी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.