सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. अखेर ७ फेब्रुवारी रोजी ही दोघं विवाहबद्ध झाली आहेत. सिद्धार्थ-कियाराचा शाही विवाहसोहळा जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसवर संपन्न झाला. या लग्नाला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. निर्माता-दिग्दर्शक करण जोहर देखील त्यांच्या लग्नाला उपस्थित होता. आता लग्नानंतर त्याने या नवविवाहित दांपत्याला मोठं गिफ्ट दिलं आहे.

५,६ आणि ७ फेब्रुवारी रोजी या दोघांचं लग्न जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये धुमधडाक्यात पार पडलं. ५ तारखेला मेहंदी, ६ फेब्रुवारीला हळद आणि संगीत समारंभ पार पडला. तर ७ फेब्रुवारी रोजी दुपारी ही दोघं लग्न बंधनात अडकली. त्यांच्या लग्नानिमित्त करण जोहरने एक खास पोस्ट लिहित त्यांचं अभिनंदन केलं होतं. पण आता फक्त पोस्टच नाही तर त्याने त्यांच्या लग्नानिमित्त त्यांना एक खास भेटही दिली आहे.

pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Sharad Pawar
“राज्यात दहशतीचं वातावरण, कृपा करा अन्…”, शरद पवारांकडून मस्साजोगच्या ग्रामस्थांना धीर; म्हणाले, “आता आपण सगळ्यांनी…”
Lakaht Ek Aamcha Dada
Video : “गावासमोर धिंड काढली नाही, तर…”, तुळजाचे डॅडींना चॅलेंज; नेटकरी सल्ला देत म्हणाले, “काहीही करून तुमचं नातं…”
‘या’ अभिनेत्याची एक चूक मनोज बाजपेयी यांच्या जीवावर बेतली असती; स्वतः खुलासा करत म्हणाले, “आमची जीप एका मोठ्या…”
Milind Gawali
“१२ वीमध्ये मी मराठी विषयामध्ये नापास झालो”; मिलिंद गवळी म्हणाले, “मी वर्गात जाताना…”
loksatta readers feedback
लोकमानस: मारकडवाडीतील दडपशाही असमर्थनीय
amdar niwas Nagpur , Amol Mitkari Grievance ,
आमदार निवासातील गरम पाण्याचे गिझर बंद; आमदार म्हणतात, “अंघोळ करायची कशी?”

आणखी वाचा : सिद्धार्थ-कियाराने लग्नाच्या २ दिवसांतच रचला नवा विक्रम, ‘या’ बाबतीत रणबीर-आलियाही टाकलं मागे

करण जोहरकडून सिद्धार्थ-कियाराला मिळालेली भेट म्हणजे ३ बिग बजेट चित्रपट आहेत. ‘शेरशहा’ चित्रपटातील सिद्धार्थ आणि कियाराची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली. त्यानंतर हीच जोडी पुन्हा एकदा तीन वेगवेगळ्या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटांची निर्मिती करण जोहर करणार आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, सिद्धार्थ-कियाराने करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनशी एक करार केला आहे. त्यानुसार ही जोडी धर्मा प्रोडक्शनच्या ३ चित्रपटांत दिसणार आहे. त्यातील एक चित्रपट शशांक खेतान दिग्दर्शित करतील असे बोलण्यात येत आहे. हा चित्रपट ‘बद्री की दुल्हनिया’ या फ्रेंचायझीमधील असेल. पण यांचे हे चित्रपट कधी प्रदर्शित होतील हे अजून जाहीर झालेलं नाही.

हेही वाचा : सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणीला रद्द करावा लागला हनिमून, ‘हे’ आहे कारण

दरम्यान सिद्धार्थ आणि कियाराचा लग्न सोहळा शाही थाटात पार पडला. या लग्न सोहळ्यासाठी या पॅलेसमध्ये ८० खोल्या बूक करण्यात आल्या होत्या. या लग्नाला १०० टे १५० पाहुण्यांनाच निमंत्रण देण्यात आलं होतं. सिद्धार्थ आणि कियाराचे नातेवाईक, मित्र मंडळींबरोबरच बॉलिवूडमधील अनेक कलाकार उपस्थित होते.

Story img Loader