बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माता म्हणून करण जोहरने आपली वेगळी ओळख तयार केली आहे. तो कायमच स्वत:ला काळाच्या बरोबरीने बदलत असल्याचे पाहायला मिळते. सतत विविध कारणांमुळे चर्चेत असलेला करण जोहर आता मात्र त्याला काका म्हणून हाक मारल्याने मोठ्या चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

करण जोहर सध्या लंडनमध्ये सुट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. लंडनच्या रस्त्यावर करण जोहर आपल्या चाहत्यांसोबत फोटो घेताना दिसत आहे. त्या वेळचा हा व्हिडीओ आहे. जेन थडानी या एन्फ्लुएन्सरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला, जेन म्हणताना दिसतो की, ओह माय गॉड, ओह माय गॉड, मित्रांनो, तो करण जोहर आहे, यार! मी त्याला काय म्हणू? केजो? करण? करण जोहर? मिस्टर जोहर? करण मिस्टर?” जेन थडानी स्वत:शीच असे पुटपुटताना दिसत आहे. पुढे तो म्हणतो की, आता मी त्याच्याकडे जाणार आहे.

myra vaikul baby brother naming ceremony
Video : मायरा वायकुळच्या लहान भावाच्या बारशाचा राजेशाही थाट! नाव ठेवलंय खूपच खास, अर्थही सांगितला
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
Kurla Bus Accident: Amid Probe, Viral Video Shows Another BEST Driver Buying Liquor From Wine Shop In Mumbai's Andheri shocking video viral
मुंबईत हे काय चाललंय? बेस्ट चालकाने बस थांबवली, वाईन शॉपवरुन दारु घेतली; कुर्ला अपघातानंतर दुसरा धक्कादायक VIDEO व्हायरल
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
Funny video The Little Girl Requests Alexa To Use Abusive Language But She Receives A Funny Reply Video Goes Viral
VIDEO: “Alexa शिव्या दे ना…”, चिमुकलीच्या विनंतीवर अ‍ॅलेक्साने दिलं जबरदस्त उत्तर; ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल
Navri Mile Hitlerla actress dance on Kishore kumar Eena Meena Deeka song watch video
Video: ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील कलाकारांचा किशोर कुमार यांच्या ‘या’ गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ
इन्स्टाग्राम

पुढे पाहायला मिळते की, करण जोहर जेनबरोबर फोटो काढताना दिसत आहे. त्याच वेळी जेन करणला, हाय काका! म्हणताना दिसत आहे. हे ऐकल्यानंतर करण जोहरच्या चेहऱ्यावर धक्का बसल्याचे हावभाव दिसत आहेत. तू मला काका म्हणालास का?, असे करण जोहरने त्याला विचारले आहे. मात्र, सुरुवातीला धक्का बसल्यानंतर जेन त्याची गंमत करीत आहे, हे नंतर त्याला समजल्याचे व्हिडीओमध्ये ऐकू येत असलेल्या हसण्यावरून समजत आहे. जेनने हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्याने लिहिले आहे की, सहयोग केल्याबद्दल धन्यवाद, काका! सोशल मीडियावर करणला काका म्हटल्यानंतर त्याने दिलेल्या प्रतिक्रियेची मोठी चर्चा होताना दिसत आहे.

हेही वाचा: ठरलं तर मग : मायलेकींचं प्रेम! प्रतिमासाठी सायली गाणार अंगाई; पूर्णा आजीचे डोळे पाणावले, मालिकेत पुढे काय घडणार?

करण जोहरने जेनने शेअर केलेला व्हिडीओ इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करीत, “जेन तुला भेटून खूप आनंद झाला!” असे म्हटले आहे. त्यावर रिप्लाय देताना जेनने ‘धन्यवाद काका’, असे हसणाऱ्या इमोजी जोडत म्हटले आहे.

दरम्यान, करण जोहर हा सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या बॅड न्यूज या चित्रपटाची निर्मिती त्याने केली आहे. या चित्रपटात विकी कौशल, तृप्ती डिमरी हे कलाकार मुख्य भूमिकांत दिसले आहेत. त्याबरोबरच काही दिवसांपूर्वी फेय डिसूझा यांना दिलेल्या मुलाखतीत करण जोहरने म्हटले होते की, मी माझ्या शरीराबद्दल आनंदी नाही. मी जसा दिसतो, जसा बेढब आहे, त्याबाबत मला कायम अवघडल्यासारखे वाटते. मला माझ्या शरीराबद्दल न्यूनगंड आहे आणि त्यामुळे पूलमध्ये जाताना मला आत्मविश्वास वाटत नाही. लहान असतानादेखील मला असेच वाटत असल्याचे करण जोहरने या मुलाखतीत म्हटले आहे. त्याने स्वत:च्या शरीराबद्दल त्याला आत्मविश्वास वाटत नसल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे तो मोठ्या चर्चेत होता.

Story img Loader