बॉलीवूड निर्माता, दिग्दर्शक करण जोहरची आई हीरू यश जोहर यांना मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. करण जोहर आणि त्याचा जवळचा मित्र मनीष मल्होत्रा करणच्या आईला भेटायला मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात आल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘विरल भयानी’ या इन्स्टाग्राम पेजने शनिवारी (७ डिसेंबर २०२४) करण जोहर फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रासह त्याची आई हिरू जोहर यांची भेट घेण्यासाठी रुग्णालयात आला होता असा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

Advait kadne
‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अद्वैत कडणेने शेअर केला ‘मन्या’च्या लूकमधील फोटो; आशुतोष गोखले, अपूर्वा गोरेसह कलाकारांकडून कमेंट्सचा पाऊस
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
mantra of happy married life
Video : नात्यांमध्ये इगो बाजूला ठेवा, काका काकूंनी सांगितला सुखी संसाराचा मंत्र, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ही अरेंज मॅरेजमधील सुंदरता आहे..”
kartik aaryan got degree after 10 years
Video : कार्तिक आर्यनला दहा वर्षानंतर मिळाली इंजिनिअरिंगची पदवी; व्हिडीओ शेअर करत अभिनेता म्हणाला, “बॅकबेंचरपासून ते…”
Maharashtrachi Hasya Jatra Fame Rohit Mane new car
Video : “साताऱ्याची माणसं ‘THAR’ वेडी…”, म्हणत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने घेतली नवीन गाडी! सर्वत्र होतंय कौतुक
Sangeet Manapmaan Movie Review in marathi
नावीन्यपूर्ण अनुभव देणारा चित्रप्रयोग
Jahnavi Killekar And Nalinee Mumbaikar
जान्हवी किल्लेकर पोहोचली नलिनी काकूंच्या घरी! चुलीवर बनवलं ‘Banana Leaf पापलेट’, दोघींना एकत्र पाहून नेटकरी म्हणाले…
marathi actress Ashwini Chavare bold photos
ओले केस अन् गळ्यात फक्त नेकलेस, मराठी अभिनेत्रीचे बोल्ड फोटो पाहिलेत का?

हेही वाचा…Pushpa 2 Vs Interstellar वादात जान्हवी कपूरने घेतली उडी; कमेंट करत म्हणाली, “तुम्ही पाश्चिमात्य…”

हीरू यश जोहर रुग्णालयात दाखल

“करण जोहर आणि त्याचा जवळचा मित्र मनीष मल्होत्रा अंबानी रुग्णालयात हीरू जोहर यांना भेटण्यासाठी आले होते. त्या काल रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्या लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी त्यांना शुभेच्छा!” असा संदेश ‘विरल भयानी’ने या व्हिडीओबरोबर पोस्ट केला आहे. व्हिडीओवरील मजकूरात पुढे म्हटले आहे की, “करण जोहरच्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तीने काळजी करण्याचे काहीच कारण नसल्याचे सांगितले आहे. आम्ही त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करतो !” असा मेसेज विरल भयानीने या व्हिडीओच्या पोस्टवर लिहिला आहे. करण जोहरने अद्याप यावर कोणतेही वक्तव्य केलेले नाही.

करण जोहरची आई हीरू जोहर या सध्या ८१ वर्षांच्या आहेत. करण त्याचे मुलं यश आणि रूहीबरोबर आई हीरू यांचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असतो.

हेही वाचा…पहिल्याच सिनेमासाठी दिग्दर्शकानं नाकारलं, झोपडपट्टीत राहिला होता ‘हा’ अभिनेता; अनुभव शेअर करत म्हणाला, “मी त्यांच्या बोलण्याचा…”

२०२१ मध्ये दोन मोठ्या शस्त्रक्रिया

हीरू जोहर यांच्यावर २०२१ मध्ये केवळ आठ महिन्यांच्या कालावधीत दोन मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या होत्या. त्यांच्या पाठीच्या कण्यावर स्पाइनल फ्युजन शस्त्रक्रिया आणि उजव्या गुडघ्याचे रिप्लेसमेंटही झाले होते. करण जोहरने स्वतः त्याच्या इन्स्टाग्रामवर ही बातमी शेअर करत आपल्या आईच्या तब्येतीसाठी मिळालेल्या शुभेच्छांचे आभार मानले होते.

हेही वाचा…आमिर खानने अनेक वर्षानंतर लावली अवॉर्ड शोला हजेरी, मिळाला ‘हा’ आंतरराष्ट्रीय पुरस्कार

करण जोहर अलीकडेच नेटफ्लिक्सच्या ‘फॅब्युलस लाइव्ह्स ऑफ बॉलीवूड वाइव्ह्स’ या शोमध्ये सहभागी झाला होता. त्याशिवाय, त्याने आलिया भट्टची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘जिगरा’ या सिनेमाची सहनिर्मिती केली होती.

Story img Loader