चित्रपट निर्माता करण जोहर सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. करण जोहरने अचानक न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच आपल्या नावाचा गैरवापर होत असल्याची याचिका करणने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. ‘शादी के डायरेक्टर करण और जोहर’ या चित्रपटावर करणने बंदी घालण्याची मागणी केली आहे. हा चित्रपट १४ जून रोजी रिलीज होणार आहे. करणने आपल्या याचिकेत असं लिहिलं आहे की, चित्रपटाच्या नावावरून त्याची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘शादी के डायरेक्टर करण और जोहर’च्या निर्मात्यांविरोधात तसेच लेखक-दिग्दर्शक बबलू सिंग यांच्याविरोधात करणने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. या चित्रपटाच्या निर्मात्यांना त्याचे नाव वापरण्यापासून रोखले पाहिजे, असे करणचे म्हणणे आहे. बुधवारी या चित्रपटाच्या प्रदर्शनावर तात्काळ बंदी घालण्यासाठी न्यायमूर्ती आर. आय. छागला यांच्या खंडपीठासमोर खटला सादर करण्यात आला. हा चित्रपट १४ जून २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. खंडपीठाने त्यास मान्यता दिली असून तातडीने दिलासा मिळावा यासाठी याचिकेवर गुरुवारी सुनावणी होणार आहे. करण जोहरने डीएसके लीगलच्या माध्यमातून निर्माता इंडिया प्राइड ॲडव्हायझरी आणि संजय सिंग आणि लेखक-दिग्दर्शक बबलू सिंग यांच्याविरोधात उच्च न्यायालयात खटला दाखल केला. या प्रकरणी संजय आणि इतरांविरुद्ध चित्रपटाच्या शीर्षकात करणच्या नावाचा वापर करण्यावर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.
खटल्यात करणने दावा केला की, त्याचा चित्रपट आणि निर्मात्यांशी कोणताही संबंध नाही, जे चित्रपटाच्या शीर्षकामध्ये बेकायदेशीरपणे त्याचं नाव वापरत आहेत. करण म्हणाला की, “चित्रपटाच्या शीर्षकात माझे नाव थेट नमूद केलं आहे, यामुळे माझे व्यक्तिमत्त्व हक्क, प्रसिद्धी आणि गोपनीयतेच्या अधिकारांचे उल्लंघन होत आहे. माझ्या ‘ब्रँड नेम’चा गैरवापर करून निर्माते माझ्या प्रतिष्ठेचा गैरफायदा घेत आहेत, जे कायदेशीररित्या योग्य नाही” असाही दावा करणने केला. करणने फिर्यादीत म्हटलं आहे की, हा चित्रपट १४ जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे आणि या चित्रपटाचा ट्रेलर आणि त्याचे पोस्टर्स सार्वजनिकरित्या आणि सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहेत. या ट्रेलर आणि पोस्टर्समुळे करणच्या प्रतिष्ठेला निर्माते नुकसान पोहोचवत आहेत.
करण जोहरच्या नावाचा एकत्र किंवा तुकड्यांमध्ये वापर करून अशाप्रकारे चित्रपट प्रदर्शित केल्याने त्याच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचेल, जी प्रतिष्ठा त्याने इतकी वर्ष कठोर परिश्रम करून श्रम आणि पैसा गुंतवून कमावली आहे.
‘शादी के डायरेक्टर करण और जोहर’ हा एक कमी बजेटचा चित्रपट आहे, ज्यामध्ये अमन सिंग दीप, पार्थ आकेरकर, मोनिका राठोड, अमित लेखवानी मुख्य भूमिकेत आहेत.