बॉलीवूडमध्ये २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाने सर्वाधिक कमाई केली होती. मात्र, यानंतर पुन्हा एकदा बॉलीवूडकरांवर ‘ये दुख काहे खतम नही होता’ हा डायलॉग बोलण्याची वेळ आली आहे. कारण, २०२४ चं अर्ध वर्ष उलटूनही अद्याप कोणत्याही चित्रपटाला ‘जवान’चा हा रेकॉर्ड ब्रेक करता आलेला नाही. याशिवाय रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ वगळता अन्य कोणत्याही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ‘जवान’च्या जवळपास जाणारं कलेक्शन देखील केलेलं नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित झालेला हृतिक-दीपिकाचा ‘फायटर’ Sacnilk नुसार ३५८ कोटींचं कलेक्शन करू शकला. खरंतर, या चित्रपटाकडून सर्वांनाच मोठी अपेक्षा होती. बॉक्स ऑफिसवरच्या या सद्यस्थितीबाबत प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक करण जोहरने पत्रकार फेय डिसुझाच्या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.

हेही वाचा : “ज्यांच्या घरातली स्त्री दुःखी त्याची बरबादी…”, ‘धर्मवीर २’चा टीझर प्रदर्शित! उलगडणार आनंद दिघेंच्या हिंदुत्वाची गोष्ट

करण म्हणाला, “सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अलीकडच्या काळात प्रेक्षकांनी त्यांची अभिरुची, त्यांना काय आवडतं हे निश्चित केलं आहे. त्यांना एक विशिष्ट प्रकारचा सिनेमा आवडतो. एक निर्माता म्हणून तुम्हाला प्रेक्षकांना सिनेमागृहांपर्यंत आणायचं असेल तर तुमच्या चित्रपटात A, B आणि C असे सगळे प्रकार पाहिजे. याशिवाय सध्याच्या काळात चित्रपट निर्मितीचा खर्च देखील खूप जास्त वाढलाय. सर्वत्र महागाई आहे. कलाकार मोठ्या प्रमाणात पैशांची मागणी करू लागलेत. या व्यतिरिक्त चित्रपटासाठी लागणारे पैसे, मार्केटिंगचा खर्च येतो तो एक वेगळा असतो. आजच्या घडीला ३.५ कोटीचं बॉक्स ऑफिस ओपनिंग देणारे स्टार्स ३५ कोटी मानधन मागतात. हे गणित जुळतं का? आपण या सगळ्या गोष्टी एकाचवेळी मॅनेज करू शकत नाही. तरीही, या परिस्थितीमध्ये तुम्हाला सिनेमा बनवावा लागतोय कारण, आपल्याला आपली संस्था चालवायची असते. तिकडे काम करणाऱ्यांची घरं त्यांच्या पगारावर चालत असतात. मी सांगितल्याप्रमाणे अशाप्रकारची बरीच कारण यामागे आहेत. यामुळे एकंदर सिनेमावर परिणाम होतो.”

“हिंदी सिनेमाच्या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट अशी की, सर्वांना वाटतं ‘पठाण’ व ‘जवान’ हे चित्रपट चालले म्हणजे आपण सतत अ‍ॅक्शनपट बनवायचे. मग सगळे निर्माते अ‍ॅक्शन चित्रपटांच्या मागे लागतात. एवढ्यात अचानक एक छानशी प्रेमकहाणी असलेला चित्रपट चालतो…त्यानंतर पुन्हा तसेच चित्रपट बनवले जातात… आपण डोक्याचा भाग नसलेल्या कोंबड्याप्रमाणे या चक्रामागे धावत असतो. खरंतर, ही सगळी मानसिकता आहे. आजही प्रेक्षकांना मूळ भारतीय सिनेमा हवा आहे. जो सिनेमा कोणत्याही समीक्षकांच्या प्रतिक्रियांचा विचार न करता प्रेक्षकांना निव्वळ आनंद देईल” असं करण जोहरने सांगितलं.

हेही वाचा : Video: अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यातील परफॉर्न्ससाठी बादशाहने घेतलं ‘इतकं’ मानधन, बॉलीवूड सेलिब्रिटींसह पंड्याही थिरकला रॅपरच्या गाण्यांवर

दरम्यान, करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने निर्मिती केलेला ‘Kill’ चित्रपट ५ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. Sacknilk नुसार, या चित्रपटाने पहिल्या दिवशी अवघ्या ६७ लाखांची कमाई केली आहे. खरंतर या चित्रपटासाठी पहिल्या दिवशी १-२ कोटींची ओपनिंग अपेक्षित होती पण, तसं घडलं नाही. वीकेंडला या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karan johar opens up on bollywood ongoing crisis says actors asking for 3 crore sva 00
Show comments